मोलखेडा येथे हंगामात शेतीपंपासाठी दिवसा लाईट देण्याची मागणी

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना हिवाळ्यात तीन महिने शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा लाईट देण्याची मागणी सरपंच ज्ञानेश्वर वारांगणे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. नुकताच शेती पिकांचा रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे.या हंगामात शेतकन्यांकडून गहू, कांदा,भुईमूग, हरभरा व भाजीपाला मासारखी पिके घेतली जातात. बहुतेक पिकांना सारा पद्धतीने पाणी चावे लागते. त्यामुळे सदर पिकांना शेतात उभे राहूनच पाणी द्यावे लागते. हिवाळ्यात दवबिंदू होण्यापर्यंत तापमान खाली जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देणेकरीचे व त्रासदायक बनले आहे. हिवाळ्यातील डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तापमान हे तीन ते चार अंश इतके कमी झाल्याचे पाहावयास मिळालेले आहे. अशा परिस्थितीत आहे.रात्री कडाक्याच्या थंडीत शेतीपिकांना पाणी देताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना विविध शारीरिक आजार होत आहेत. शेतकन्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास लाईट मिळावी ही मागणी ब-याच वर्षापासून होतत थापि सरकारने हिवाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत तरी शेतीसाठी दिवसा लाईट पुरवावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा त्रास व कष्ट कमी होतील, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच ज्ञानेश्वर वारांगणे यांच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास कृषी मंत्र्यांच्या सोयगाव तहसील कार्यालय तहसील येथे व सावळदबारा ३३ केव्ही उपकेंद्र महावितरण सावळदबारा येथे मोर्चा काढण्यात येईल यामध्ये सावळदबारा व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार अशे निवेदने देण्यात आले आहे.यावेळी मोलखेडा येथील रवींद्र गायकवाड, उपसरपंच गुलाबसिंग राणा,डिंगाबर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, अतुल इंगळे,अमोल शेळके, वैभव गायकवाड, भूषण राणा, ज्ञानेश्वर मखसर,अनंता गायकवाड, गणेश शिनगारे, यांची उपस्थिती होती.

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *