सिल्लोड तालुक्याचा चौफेर विकास करणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार विविध गावांतील विकास कामांचे भूमिपूजन

Khozmaster
2 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील विविध गावांचा स्मार्ट व्हिलेज पोखरा योजनेत समावेश करून त्यामाध्यमातून ग्रामीण भागाचा चौफेर विकास साधणार असल्याने प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्तपणे तालुक्यात प्रत्येक गावांत ग्रामसभेच्या माध्यमातून सुरू असलेले विकास कामे व शासकीय योजनेची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश कृमिंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील पालोद सर्कल मधील अन्बी, रहिमाबाद आसडी, दहिगाव, डोंगरगाव, भवन सर्कलमधील बाभूळगाव, गेवराई सेमी, भायगाव, तर अजिंठा सर्कल मधील पानस, खंडाळा, बोदवड, सराटी,बाळापूर, मुखपाठ, वसई, जळकी, कला या गावात विविध विकास कामांसाठी २३ फटीतरमा मंगरुळ पालीद अनयी रहिमाबाद आसडी रस्त्याच्या कामासाठी ०८ कोटी ५० लाख तर उंडणगाव सोयगाव शेंदुरणी रस्त्याच्या कामासाठी ०७ कोटी असे ३८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली.यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवीदास पा लोखंडे उपस्थिती होती.उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाढे, जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे,अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, न. प. गटनेता किशोर सहारे, मच्छिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, अशोक सूर्यवंशी, दामूअण्णा गव्हाणे, विठ्ठल सपकाळ,शंकरराव खांडवे, मधुकर गवळी, सतीश ताठे, सयाजी वाघ, रमेश दांडगे, डॉ. दत्तात्रय भवर राजूमिया देशमुख, भास्कर बनकर आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *