खामगांव तालुक्यातील मेहकर रोडवरील शिर्ला नेमाने पुलाखालील घटना योगेश नागोलकार पातूर: खामगांव :-बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने मन नदीपात्रामध्ये एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात आढळला आहे.अंदाजे 25 वर्षीय महिलेचा बलात्कार करून गळा दाबून मृतदेह पाण्यात टाकल्याची प्राथमिक माहिती खामगाव तालुक्यातील मेहकर रोडवर असलेल्या शिरला नेमाने मन नदी पात्रामध्ये एका 25 वर्षीय महिलेचा पाण्यात मृतदेह आढळला आहे. शिरला बस स्थानकाजवळ असलेल्या पुलाखाली मृतदेह असल्याची माहिती मिळताच त्या घटनास्थळी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात पाहण्यास गर्दी केली होती. हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. असता श्वानपथकाला घटनास्थळी प्राचारण केले आहे. खामगाव पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला नेमाने नजदीक मन नदी पात्रात पुलाखाली एका 25 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात आढळला असून त्याचा रुमाल पुलावर पडलेला आहे. कदाचित अज्ञात इसमाने बलात्कार करून गळा दाबून मृतदेह पाण्यात टाकला असावा असा अंदाज पोलीसांन कडून व गावातील नागरिकांनकडून व्यक्त केला जात आहे. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यास गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अमोल कोळी हे देखील घटनेस्थळी दाखल झाले होते. बॉडीला बाहेर काढून पंचनामा करून खामगांव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हिवरखेड पोलिसांचा तपास सुरू झाला आहे .खामगाव तालुक्यातील या घटनेमुळे सर्वत्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पुढील तपास हिवरखेड पोलीस करित आहेत.
