पालगर प्रतिनिधी, सौरभ कामडी
स्पार्क फाऊंडेशन-ठाणे तर्फे आज राजीव गांधी मुलांचे वसतिगृह वाकडपाडा येथे सौर ऊर्जेवर आधारीत गरम पाणी वितरण व्यवस्था उभारण्यात आली.सूर्याचे एक नाव ‘मित्र’ असल्याचा संदर्भ घेऊन या यंत्रणेचे नामकरण ‘मित्र’ असे करण्यात आले आहे. मोखाडा पंचायत समिती उपसभापती श्री.प्रदीप माधव वाघ यांचे तर्फे सूर्याचे नमन व आवाहन करण्यात आहे.तर वसतीगृहातील सर्वात लहान विद्यार्थी धीरज सोमनाथ वारघडे याच्या हस्ते ‘मित्र’ चे उद्घाटन करण्यात आले. गरम पाण्याची बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित सोय उपलब्ध झाल्याने मुलांनी ताशा वाजवून आनंद प्रकट केला. या प्रसंगी श्री.प्रदीप वाघ यांनी ऐन हिवाळ्याआधी मुलांची सोय झाल्याने समाधान व्यक्त केले व पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला.
यावेळी वसतीगृह अधीक्षक श्री.पवार सर, स्पार्क संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.नितीन गणपत पिठोले, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री विठ्ठल गोडे पोलिस पाटील, श्री संजय वाघ माजी सरपंच, शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 27