सतीश मवाळ हिवरा आश्रम
देशभरात हिवरा आश्रम गावचे नावं एका आश्रमाच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि याच आश्रमाचा पाया रचनारे संत शूकदास महाराज यांची दी.22 नोव्हेंबर रोजी 80 वी जयंती उस्तव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने प.पु.शुकदास महाराज यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेत हिंदुराष्ट्र सेनेने हिवरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विद्यार्थिनिही आपला सक्रीय सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले .दी. 22 नोव्हेंबर रोजी संत शूकदास महाराज यांची 80 वी जयंती निमित्त स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे हिंदुराष्ट्र सेने तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन – अशोक थोराहाते, प्रवीण गीते, शिध्देश्वर पवार, जगदीशचंद्र पाटील, आत्मानंद थोरहाते, रवी माळवांडे, रोहित पगारिया, राजेश पिंगळे, प्रा. पवार, प्रा. गोरे, यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर रक्तदान शिबिरात एकूण 65 लोकांनी रक्तदान करुण संत शुकदास महाराज यांना आदरांजली वाहिली.या शिबिरात 4_विद्यार्थिनीनिही रक्तदान करुण ईतर विद्यार्थिनी मध्ये एक आदर्श उदाहरण दिले.सदर रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष- विजय पवार, दिलीप काकडे, दत्तात्रय मवाळ, प्रमोद शेळके, पवन सातपुते, गोपाल शिंदे, गौतम वाकोडे, अशोक जाधव, गोपाळ शिराळे, विजय वायाळ,शिवा जाधव सोनु गवळी. नागेश महाकाळ.नागेश ठाकूर.पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहे.