औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
औरंगाबाद कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी ओढून नेताना तक्रारदाराला मारहाण केली होती. त्याच्यावर कारवाई करून दुचाकी परत आणून देण्याच्या बदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उस्मानपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस नाईकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. हि कारवाई २४ नोव्हेंबर रोजी दुपारी उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या आवारातील चहाच्या टपरीवर करण्यात आली. प्रकाश घोडिया सोनवणे असे लाचखोर पोलीस नाईकाचे नाव आहे.तक्रारदार फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून दुचाकी खरेदी केली होती. मात्र, कर्जाचे हप्ते न भरल्याने कंपनीच्या कर्मचान्यांनी दुचाकी घेऊन गेले. जाताना त्यांनी तक्रारदार यांना मारहाण केली होती. मारहाणीची तक्रार त्याची उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारी अर्जानुसार मारहाण करणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचान्यावर कारवाई करून दुचाकी परत मिळवून देण्याच्या बदल्यात पोलीस नाईक प्रकाश सोनवणे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाव यांनी केली. लुचपत प्रतिबंधक विभागाकडे यांनी बजाज (एसीबी) तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शहनिशा करून उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. एका चहाच्या टपरीवर पाच हजार रुपये स्वीकारताना सोनवणे पाला रंगेहात पकडण्यात आले याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खोबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, राजेंद्र जोशी, सुनील पाटील, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी केली
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 12