एन.सी.सी.च्या सायकल रॅली महापरिक्रमेचे अकोल्यात जोरदार स्वागत

KHOZ MASTER
1 Min Read
महाराष्ट्र डायरेक्ट एन.सी.सी. यांच्या मार्गदर्शनाने तसेच अमरावती एन.सी.सी. ग्रुप अमरावती यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या ठीमचे औचित्य साधून जळगाव ते मुंबई अशी एकूण 2200 किलो मीटर ची सायकल रॅली महापरिक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. ही महापरिक्रमा सायकल रॅली जळगाव येथून सुरू होऊन अकोल्यामध्ये काल पोहोचली. आज सकाळी अकोल्याचे कलेक्टर निमा अरोरा मॅडम यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन अमरावती येथे ही रॅली पोहोचणार आहे. दिनांक २७ ला अमरावती एन.सी.सी. ग्रुप चे ग्रुप कमांडर शंतनू मयंक हे या रॅलीला हिरवी झेंडी देतील. या परिक्रमेसाठी ११ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.अकोल्याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांची निवड झाली आहे. यामध्ये एकूण १५ व्यक्ती सहभागी असून १० एन.सी.सी. कॅडेट् व इतर स्टॉप सोबत आहे. यामध्ये अमरावती व अकोला या परिक्षेत्रातील एन.सी.सी. कॅडेट सहभागी असून ही परिक्रमा जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, पंढरपूर, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे व मुंबई अशी एकूण 2200 किलोमीटरची परिक्रमा 22 दिवसांमध्ये पूर्ण करून मुंबई येथे त्याची सांगता होईल. या परिक्रमेसाठी भाग घेतलेल्या सर्व सहकारी मित्रांना सर्वाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *