प्रविण चव्हाण नंदुरबार
रेल्वे पट्ट्याकडील नागरिकांची होणार सुविधा;६ लाख लिटर क्षमता.
शहरातील आदेश्वरनगरात जलकुंभ बांधकामाचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
जलकुंभ ६ लाख लिटर क्षमतेचे असून,१ कोटी १९ लाख रुपये बांधकामास खर्च येणार आहे. नवीन जलकुंभामुळे रेल्वे पट्ट्याकडील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी व नागरिकांच्या पाण्याची समस्या सुटावी यासाठी रेल्वे पट्ट्यापलीकडील आदेश्र्वर नगरात ६ लाख लिटर्स क्षमतेच्या उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवारी सकाळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक जगन्नाथ माळी, फारुख मेमन,चेतन वळवी, फरीद मिस्त्री,उद्योजक किरण तडवी, राजेश कोचर, प्रफुल्ल खैरनार, पारसमल कोठारी,खेतमल कोठडीया, कांतीलाल बेदमुथा, अशोक सोमानी,अशोक शहा, अनिल सुराणा,दिलीप कोठारी, भवरलाल जोशी,विपुल शहा उपस्थित होते.
नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने केला ठराव
परिसरामध्ये ३० वर्षांपूर्वीचे जुने जलकुंभ आहे.त्यास जमीनदोस्त करून नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहे.सध्याच्या जलकुंभात पाण्याच्या साठा करण्यात येत नाहीये. सध्याचा जलकुंभ मोडकळीस असल्याने त्याची बांधकाम क्षमतेची मुदत देखील संपलेली आहे.शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा व पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी नगरपालिकेने ठराव करून आदेश्र्वर नगरात नवीन जलकुंभ बांधण्याच्या ठराव करण्यात आला आहे.
२ लाख लिटर पाणी वाढविले
जुने जलकुंभात ४ लाख लिटर पाण्याची क्षमता आहे.परंतु, नंदुरबार शहराच्या विस्तार व नागरिकांची वाढती संख्या विचारात घेऊन नवीन जलकुंभात २ लाख लिटर पाण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे
Users Today : 32