औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर अतिरेकी हल्ल्यात नागरिकांचे प्राण वाचविताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पोलीस स्टेशन व एम,जी,एम,कॉलेज औरंगाबाद च्या रक्त पेढीच्या वतीने शनिवार(ता,२६)रोजी पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबिरात पोलीस अधिकारी,कॉन्स्टेबल, पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते,सेवा निवृत्त फौजी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शहिदाना अभिवादन केले, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, स,पो,नि, राम घाडगे,विजय नरवडे,पो,उप,निरीक्षक मनोज पाटील,श्रीराम काळे,विजय घोटकर,फौजी गौतम गायकवाड ,यांनी रक्तदान ची सुरवात केली,सामाजिक
कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,यांनी २६/११च्या घटनेची माहिती दिली,रक्तदान महत्व विशद केले व सर्वांनी प्रथम दोन मिनिटे उभे राहून शहिदाना श्रद्धांजली वाहिली,एम,जी, एम,रक्त संकलन पथक प्रमुख डॉ,शताब्दी पाल,सहाययक आशुतोष देव,उत्तम नरवडे, कल्याण पाथरीकर, माचिंद्र जाधव,दत्ता वाकडे,सुनील गवळी यांनी रक्त संकलित केले,या प्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरखान,पारस घाटे ,आमिरअली,मन्सूर अली,अमोल राजपूत,श्री देवकर,यांनी या शिबिराला भेटी दिल्या,(फोटो कॅप्शन
पो,नि, साम्राटसिंह राजपूत रक्तदान करतांना, शेजारी
धोंडीरामसिंह राजपूत,गौतम गायकवाड ,विजय घोटकर व रक्त संकलन पथक)
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 6