मजूराचा संशयास्पद मृत्यू : पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी..  मृतदेह मिठात ठेवला पुरुन.

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
ऊस तोड मजुरीसाठी माळशिरस तोंडले येथे गेलेल्या कालीबेल तालुक्यातील ( ता . धडगांव ) येथील ईश्वर सिपा वळवी यांचा मनमाड येथे संशयास्पद मृत्यू झाला . या प्रकरणी तोंडले ता . माळशिरस जि . सोलापूर येथे दोघे व कालीबेल येथील मुकादमाची सखोल चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयताचा भाऊ सागर सिपा वळवी यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . दरम्यान , मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह मिठात पुरुन ठेवला असून पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली आहे .याबाबत सागर वळवी यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की , सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तोंडले गावातील दोघा इसमांनी ऊसतोड कामासाठी कालीबेल ( ता.धडगाव ) येथून 28 नोव्हेंबरला ईश्वर सिपा वळवी व गावातील काही मजुरांना मुकादमामार्फत घेवून गेले होते . परंतु तोंडले या गावात 20 ते 25 लोकांच्याऐवजी पाच , सहाच मजूर हो‌  त्यामुळे पाच सहा जणांना ऊस कापणे , ऊसाची मोळी बांधणे , ट्रॅक्टर भरणे शक्य नसल्याने ईश्वर वळवी यांनी अजून काही मजुरांना घेऊन या तेव्हाच काम पूर्ण होतील असे मुकादमांना सांगितले . परंतु मुकादम यांनी मागणी पूर्ण न करता तुम्हालाच पूर्ण काम करावे असे सांगून जबरदस्तीने ऊस तोड करायला लावायचे . ऊसतोड न केल्यामुळे तेथेच ईश्वर वळवी व इतर मजूरांना मारहाण करण्यात आली . शारीरिकत्यामुळे पाच सहा जणांना ऊस कापणे , ऊसाची मोळी बांधणे , ट्रॅक्टर भरणे शक्य नसल्याने ईश्वर वळवी यांनी अजून काही मजुरांना घेऊन या तेव्हाच काम पूर्ण होतील असे मुकादमांना सांगितले . परंतु मुकादम यांनी मागणी पूर्ण न करता तुम्हालाच पूर्ण काम करावे असे सांगून जबरदस्तीने ऊस तोड करायला लावायचे . ऊसतोड न केल्यामुळे तेथेच ईश्वर वळवी व इतर मजूरांना मारहाण करण्यात आली . शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ईश्वर वळवी हा घरी येत असतांना मनमाड येथे दि . 4 नोव्हेंबरला त्यांना तिघांनी एस.टी. बस मधून जबरदस्तीने उतरवून घेतले . त्यावेळी त्यांच्यापासून माझ्या जीवास धोका आहे मला लवकर घ्यायला यावे , असा फोन ईश्वर वळवी यांनी त्यांच्या वडिलांना केला होता , असे तक्रारीत म्हटले आहे . दि .5 नोव्हेंबर रोजी सकाळी ईश्वर सिपा वळवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी फोन करून सांगितले .त्यानुसार कुटुंबियांनी मनमाड गाठले व तेथून कालिबेल येथे मृतदेह आणला . प्रत्यक्ष मृतदेह बघितल्यावर त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा दिसून आल्या . ही आत्महत्या नसून मारहाण करून , गळा दाबून हत्या करण्यात आली आहे , असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे . मयत ईश्वर वळवी यांच्यावर अंत्यविधी न करता त्याचा मृतदेह मिठात पुरून ठेवण्यात आला आहे . जोपर्यंत आरोपीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही . तसे न झाल्यास पुन्हा शव विच्छेदनकरण्यात यावे अशी मागणी सागर वळवी यांनी केली आहे .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *