अनेकांच्या खात्यात अत्यल्प रक्कम….शेतकऱ्यांची थट्टा कराल तर पिकविमा कंपन्यांचे कार्यालय उद्धवस्त करु : दामू अण्णा इंगोले
शहर प्रतिनिधी बालाजी मोरे
अजुन बराच पैसा कंपनी कडुन घेणे बाकी.अनेकांच्या खात्यात अत्यल्प रक्कम….
जलसमाधी आंदोलनाच्या दणक्याने एका फटक्यातच पिकविम्याचे २१४८ कोटी रुपये मंजूर झाले असून यातील ९४२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. परंतु पिकविमा कंपनीने काही शेतकऱ्यांना प्रिमीयम पेक्षाही कमी पैसे दिले आहेत. काहींच्या खात्यात ६०, ८०, ९० अशी रक्कम जमा झाली असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची क्रुर थट्टा आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे काम विमा कंपन्यांनी केले असून, यामध्ये एआयसी या कंपनीचा प्रामुख्याने सहभाग आहे. शेतकऱ्यांची क्रुर थट्टा करणाऱ्या कंपन्यांचे कार्यालये उद्धवस्त करु, असा गंभीर इशारा दामू अण्णा इंगोले यांनी दिला आहे. एआयसी या कंपनीचे कार्यालय मुंबई येथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट मध्ये २१ व्या मजल्यावर आहे. गेल्या वर्षी या कार्यालयाचा आम्ही ताबा घेतला होता, त्यामुळे त्यांना आमच्या आंदोलनाची पद्धत चांगलीच माहित आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीने थट्टा केली आहे त्यांचे अर्ज परत बोलावून त्यांच्या खात्यात सन्मान जनक रक्कम जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या पिकविमा कंपन्यांचे कार्यालये उद्धवस्त करू, असा गंभीर इशारा दामू अण्णा इंगोले यांनी दिला आहे.
Users Today : 25