स्वागत, आदरातिथ्य, निवास व भोजन व्यवस्थेची सरबराईः लाईट ऑफ युनिटी अविस्मरणीय सादरीकरण चिखली
सर्वधर्म समभाव, बंधुत्व, प्रेम या संकल्पनेतुन देषवासियांना जोडण्याकरीता खासदार राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काष्मिर पर्यंत भारतजोडो पदयात्रेला सुरूवात केली. विदर्भाच्या पंढरीतुन बुलडाणा दाखल झालेल्या यात्रेकरूंच्या आगमनापासुन निरोप देईपर्यंत अनुराधा परीवाराने आवभगत ते स्वागातार्थ नवनविन प्रयोगातुन केलेले प्रभावी सादरीकरण, राहुलजी गांधींसह भारतजोडो यात्रेतील समस्त यात्रीकरांची मने जिंकुन गेले. परीवारातील अनुराधा अभियांत्रीकी कॉलेजच्या एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी देषातील 21 प्रांतातील पारंपारीक वेषभुषा धारण करून विविधांगी संस्कृतीचे सादरीकरण, लाईट ऑफ युनिटीच्या माध्यमातुन सर्वधर्मीय धर्म चिन्हांसह साकारलेला विषालकाय अषोकस्तंभ, 100 फुटाच्या मानवी साखळीतुन तिरंगी प्रकाषात न्हावुन निघाला. हे अविस्मरणीय क्षण ठरल्याने खासदार राहुलजी गांधी यांना सुध्दा या क्षणांची सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही या क्षाणांची प्रसार माध्यमांनीही विषेष दखल घेतल्याने भारतजोडो यात्रेच्या यषामध्ये अनुराधा परीवाराची कामगिरी ठरली ‘ माइलस्टोन’ हे येथे उल्लेखणीय.
देग्लुर नांदेड या प्रवेषव्दारातुन महाराष्ट्रात 07 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय कॉग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या कणखर नेतृत्वात दाखल झालेली भारतजोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी वरखेड फाटा येथुन संत गजानन महाराज यांच्या पुनितपदस्पर्षाने पावन झालेल्या विदर्भपंढरी म्हणुन सर्वदुर सुपरीचीत असलेल्या शेगांव या नगरीत दाखल झाली. या पदयात्रेचे आगमन प्रसंगी स्वागत, आदरातिथ्य, निवास व भोजन व्यवस्थेच्या माध्यमातुन यात्रेत सहभागी झालेल्या देषयात्री पाहुण्यांची सरबराई करण्याकरीता अनुराधा परीरावारासह बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत झोकुन दिल्याचे पाहवयास मिळाले. यात्रेकरूंसाठी बुलडाणा जिल्हयातील वरखेड येथील आगमनापासुन ते निरोप घेतलेल्या निमखेडी पर्यंत रिंगण,जाहीर सभा, लाईट ऑफ युनिटी, आदी उपक्रमांनी पदयात्रेतील यात्रेकरू अक्षरषः भारावून गेले होते.
विदर्भात दाखल झाल्यानंतर बुलडाणा जिल्हयातील तिन दिवषीय प्रवासात 18 नोव्हेंबर रोजी वरखेड येथे खासदार राहुलजी गांधी व पदयात्रेतील शेकडो देषयात्री यांच्या बुलडाणा जिल्हा आगमन प्रसंगी पंढरपुर येथील आषाडी एकदषीच्या धर्तीवर रिंगण सोहळयाच्या माध्यमातुन भारतजोडो यात्रेचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. भारतजोडो पदयात्रेचे आगमन ते बुलडाणा जिल्हयातुन निरोप प्रसंगापर्यंत यात्रेकरूंची सर्वस्वी म्हणजेच स्वागत, आदरातिथ्य, निवास, आरोग्यासह, भोजन व्यवस्थेची जबाबदारी माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या संकल्पनेतुन अनुराधा परीवाराने उचलली होती. यात वरखेड येथे स्वागत प्रसंगी अनुराधा औषधनिर्माण महाविद्यलयाच्या विदयार्थ्यांच्या पथकाव्दारे यात्रेकरूंची उपहार व्यवस्था करण्यात आली, शेगांव येथे आनंदविहार, विसावा भवन, हॉटेल शरनम, विघ्नहर्ता, सिध्दविनायक, योगी गजानन, अग्रेसन भवन, आदी ठिकाणी 500 हुन अधिक भारतजोडो यात्रेकरूंची निवास, भोजन, पासेसची अत्यंत उत्कृष्ठ व्यवस्था. त्याचबरोबर शेगांव मार्गावर जिल्हयातील इतर ठिकाणीवरून खासदार गांधी यंाच्या शेगांव येथील सभेत सहभागी होणा-या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भोजन व वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सभेप्रसंगी मुक्कामी असलेल्या यात्रेकरूंची शेगांव भक्त निवास, व इतर ठिकाणी परीवारातील अनुराधा अर्बन बॅंकेच्या वतीने यात्रेकरूंच्या निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर भेंडवळ, निमखेडी येथील कार्यक्रमांची पुर्व नियोजीत तयारी, पदयात्रे दरम्यान यात्रा मार्गावर ठिक ठिकाणी चहा,नास्ता, फराळ, आदींची चोख व्यवस्था करण्यात आली. जिल्हयात दाखल झालेल्या भारतजोडो पदयात्रेत हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अॅड.सोै. वृषालीताई बोंद्रे खासदार राहुलजी गांधी यांच्या सोबत सहभागी झाल्या. यात्रे दरम्यान हिरकणी महिला अर्बनच्या समस्त महिला व पुरूष कर्मचाÚयांनी ठिक ठिकाणी स्वयंसेवक म्हणुन हिरीरीने पदयात्रेकरूंना आवष्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
भारजोडो यात्रेच्या बुलडाणा जिल्हयातील अंतीम टप्यातील निमखेडी येथे खासदार राहुलजी गांधी व त्यंाच्यासह असलेल्या पदयात्रेतील देषयात्री व यात्रेकरूंना अनुराधा परीरावाच्या संकल्पनेतुन लाईट ऑफ युनिटी च्या प्रकाषमय वातावरणात सर्वधर्मसमभावच्या सर्वधर्मीय चिन्हांना तिरंगी प्रकाष सर्वदुर पसरवील्याने संपुर्ण आकाष तिरंगामय झाले होते. तर सुमारे 25 फुट उंचीचा प्रकाष झोताने न्हावुन निघालेल्या अषोकस्तंभावर यात्रेकरूंच्या नजरा खिळल्या होत्या. भारतजोडो यात्रेच्या आगमन ते निरोप प्रसंगापर्यंत बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणुन माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी यात्रेच्या सर्व स्तरावरील पुर्वनियोजन प्रक्रीयेत तब्बल 15 दिवसापासुन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत स्वतःला झोकुन दिले होते.
महाराष्ट्रातुन मध्यप्रदेषातील गंतव्याकडे अनुराधा परीवाराच्या वतीने निमखेडी येथुन भावविभोर अंतकरणाने निरोप देण्यात आला. शेगांव येथील सभे बरोबरच बुलडाणा जिल्हयातील यात्रेच्या तिन दिवषीय मुक्कामी विविध ठिकाणच्या पुर्व नियोजीत तयारी करीता अनुराधा परिवारातील प्राचार्य डॉ.अरूण नन्हई, प्राचार्य डॉ. कैलास बियाणी, डॉ. काळे, डॉ. पागोरे, अनुराधा अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके, हिरकणी महिला अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप भावसार, आदींसह परीवारातील विविध संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, संचालक मंडळ, महिला व पुरूष कर्मचा-यांनी भारतजोडो पदयात्रेतील सर्वस्तरातील पदयात्रेकरूंची सरबराई करण्यात आपला सहभाग नोंदविला.
Users Today : 33