तुकाराम आश्रय वृध्दाश्रम येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा
चिखली:- _ प्रतिनीधी रवि मगर-
ऋणानुबंध समाज विकास संस्थे व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे संविधान गौरव दिन व राष्टपीता महात्मा ज्योतीबा फुले स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कडुबा बोर्डे, प्रमुख मार्गदर्शक राजेश गवई सामाजीक कार्यकर्ते, प्रमुख उपस्थीतीत अॅड अनिल कर्हाडे, गोपाल कर्हाडे, रीपब्लीकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सलीमभाई, जिल्हा महासचिव ब्रम्हा साळवे, ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ लताबाई डोंगरदिवे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ आशाताई डोंगरदिवे हे होते.देशातील समस्त संत, बहुजन महापुरुषांच्या विचारांवर आधारित संविधान तयार करुन प्रत्येक नागरीकांना संरक्षण, हक्क, अधिकार बाबासाहेबांनी मिळवुन दिले असे प्रतीपादन राजेश गवई सर यांनी केले.
तसेच भारतिय संविधानाचा प्रचार प्रसार करणे हि काळाची गरज आहे यासाठी प्रयत्न करनार असे मत अॅड अनिल कर्हाडे यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती देत संविधानाचे महत्व आपल्या मार्गदर्शनात सांगीतले.
तसेच वृध्दाश्रम येथे भोकर येथिल महिला बचत गटाच्यावतीने वृध्दांसाठी ताट प्लेट वाटप कण्यात आले.यावेळी वृध्दाश्रमाच्या वतीने भोकर येथील विदयार्थांना मोफत टिवशन देण्यात येते त्या विदयार्थांनी भिम गीत व भाषणे सादर केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांतभाई डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन सौ रुपाली डोंगरदिवे यांनी केले. यावेळी संकेत डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, सचिन डोंगरदिवे, आकाश डोंगरदिवे, आदित्य डोंगरदिवे, शुभम डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे रितेश डोंगरदिवे, अमोल डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे, हर्षल डोंगरदिवे, सतिष डोंगरदिवे, महेंद्र डोंगरदिवे, निलेश डोंगरदिवे, स्वप्नील डोंगरदिवे, सौआशाताई डोंगरदिवे, सौ छायाताई डोंगरदिवे, केसरबाई डोंगरदिवे, सौ पुजाताई डोंगरदिवे, कुशीवर्ताबाई डोंगरदिवे, कासाबाई डोंगरदिवे, शारदा डोंगरदिवे, स्वाती डोंगरदिवे, सुमन डोंगरदिवे कौशल्याबाई डोंगरदिवे,सृष्टी कर्हाडे, दिक्षीता कर्हाडे, सांची डोंगरदिवे, नव्या घेवंदे, दिव्या डोंगरदिवे, खुशी डोंगरदिवे, तनुजा कर्हाडे, आचल डोंगरदिवे, कोमल डोंगरदिवे, पायल डोंगरदिवे, आरती डोंगरदिवे, योगीता डोंगरदिवे यांनी परीश्रम घेतले.
Users Today : 33