चिखली प्रतिनीधी रवि मगर
नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य वतीने संविधान उद्देशिका चिखली शहरा मध्ये घर घर राबवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे जात ना धर्म. खरा मानवता हाच खरा धर्म समता ‘ एकता बंधुता प्रथम आणी अंततः भारतीय हा विचार उर्जा देशातील नागरीकांना देत आज देशातील प्रत्येकाला अधिकार देत महिलांना मान वर करून चालण्याची मुभा नव्हती आज सन्मानाने जगत देशाची राष्ट्रपती , पंतप्रधान होत आहे हे संविधान नसते तर चुल आणी मुल या पर्यंतच मर्यादित राहील असत . आपण जो मुक्त श्वास घेतो हे ही संविधानाची देन आहे नाही तर श्वासोश्वास घेण्यासाठी सुद्धा कर भरावा लागला असता जन जागृती करत संविधान उद्देशीकेचे महत्व काय आहे जण जागृती करत केवळ संविधान उद्देशिका घर घर पोहचवण्याचा प्रयत्न केल्या जात आहे . भारताचे संविधान उद्देशिका आम्ही ,भारताचे लोक , भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरीकास, सामाजिक, आर्थिक व राजनैतीक न्याय . विचार , अभिव्यक्ती , विश्वास ,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य . दर्जाची व संधीची समानता . निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणी त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत २६ नोव्हेंबर १९ ४९ रोजी याव्दारे हे संविधान अंगिकृत आणी अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत . महान राज्य घटना अथक परिश्रम मेहनत घेऊन देशाला बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत .याची सर्वांनी जण जागृती करणे जरूरीचे आहे असे प्रतिपादन प्रशांत भटकर संस्थापक अध्यक्ष यांनी दिले . सय्यद इम्रान उपाध्यक्ष , राम अवसरमोल सचिव ,नागेश म्हस्के सह सचिव,आकाश साळवे,गौतम सोनटक्के , आकाश बनसोड, नितीन जाधव, गौतम घेवंदे, रोहीत हाडे , सुशिल जाधव, शेख जमशेद, शुभम जाधव, सुमित गवई, आतिष काळे, सुमित खंडारे , गजानन मघाडे अदींचे सहकार्य लाभले आहे . *आणखी काही दिवस घर घर संविधान पोहचवण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे .
Users Today : 37