पेठ ग्रामपंचायत च्या वतीने संविधान गौरवदिन उत्साहात साजरा….

Khozmaster
1 Min Read
पेठ/चिखली
प्रतिनिधी रवि मगर
 
खामगांव ते चिखली मार्गावर असलेले गांव पेठ ग्रामपंचायत च्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन संविधान प्रस्तावनेचे करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान  प्रथम नागरीक सरपंच विष्णूपंत शेळके यांनी स्वीकारले,तर प्रमुख मार्गदर्शक, ग्रामपंचायत सदस्य पुत्र मनोज जाधव यानी केले, प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य दीनकर डुकरे व सदस्य परमेश्वर शेळके , अशोकरत्न मिडीया चे जिल्हा संपादक रवि मगर , व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव मिसाळ यांची लाभली
सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गावातील प्रथम नागरिक सरपंच विष्णूपंत शेळके यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
संविधान साठी बाबासाहेब आंबेडकरांनी कीती कष्ट घेतले हजारो वर्षापासुन गुलामगीरीच्या बेडया तोडून बोलण्याचा न्याय हक्काचा अधिकारासह असंख्य अधिकार मिळवुन दिले तसेच संविधान वाचवण्याची जबाबदारी ही यूवा पीढीची आहे असे मनोज जाधव यांनी मार्गदर्शनात सांगीतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मनोज जाधव यांनीच केले, तसेच शेवट मुंबई येथे 26/11 च्या हल्लयात भारताचे जे विर शहीद झाले , त्यांना आदरांजली देऊन , राष्ट्रगीताने शेवट करुन या कार्यक्रम ची सांगता करण्यात आली, या कार्यक्रमास  पाणी पुरवठा विभाग विठ्ठल शेळके  व राजेंद्र पाढरे , शिपाई शिवाजी यादव ,कोतवाल विनोद सोनुने , प्रदीप मिसाळ , गजानन गवई ,  उपस्थीत होते.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *