देऊळगाव ग्राम पंचायत मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी रामेश्वर वाढी  देऊळगाव 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने लिहिलेले भारतीय राज्य घटना मानवी मुलांच्या सुरक्षेची ग्वाही देणारे भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिण्यासाठी २ वर्षे ११ महिने १८ दिवस असा दिर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले. व २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताला राज्यघटना स्वाधीन केली म्हणुन २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ग्राम पंचायत कार्यलय देऊळगाव येथे संविधान दिनाच्या निमित्ताने ग्रा. पं. सचिव इंगळे मॅडम, सरपंच पंकज सोळंके, उपसरपंच संतोष बराटे, ग्रा. पं. सदस्य भीमराव उपर्वट, गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष खराटे, सुनील उपर्वट, रामेश्वर उपर्वट, रघुनाथ खर्डे, गौतम उपर्वट, चव्हाण या सर्वांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *