औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
वैजापूर आजची सुदृढ बालके उद्याची या महान भारत देशाची खरी राष्ट्रीय संपत्ती आहे,त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी माता – भावानी आरोग्य तपासणी करून त्यांना सक्षम,सुदृढ, निकोप,निरोगी ठेवावे तरच देशाचे भवितव्य उज्वल राहील असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा से,नि, शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी रविवार(ता,२७) रोजी तालुक्यातील गारज येथील अंगणवाडी क्र,-२मध्ये रविवार असताना सुध्दा बालकांची आरोग्य तपासणीची विशेष धडक मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र मनूर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतांना अचानक भेट देऊन केले आरोग्य कर्मचारी डी,के,श्रीखंडे व शिक्षिका मनीषा देवकर करीत असताना राजपूत यांनी बालकांच्या मातांशी प्रत्यक्ष बालकांशी संवाद साधला त्या वेळी राजपूत बोलत होते, श्रीखंडे व श्रीमती देवकर यांना जिल्हा आरोग्य समितीच्या वतीने धन्यवाद देत राजपूत यांनी बालकांशी व मातांशी संवाद ही साधला,या प्रसंगी से,नि, तलाठी व नारायणी सेनेचे अध्यक्ष अशोक पवार, टी, पी,शिरोडे, यांचीही उपस्थिती होती,माता काजल पवार, शांता लांडगे,वालु चौहान हे देखील उपस्थित होते( फोटो कॅप्शन -बालकांची आरोग्य तपासणी विशेष धडक मोहिमेचे
गारज ता,वैजापूर येथे ज्योत प्रज्वलित करतांना धोंडीराम राजपूत,टी, पी,शिरोडे, अशोक पवार तपासणी पथक डी,के,श्रीखंडे, मनीषा देवकर).
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 12