थंडीत खाण्याच्या पदार्थात आणि पद्धतीत बदल करा , तुम्ही निरोगी राहाल.

Khozmaster
5 Min Read
प्रविण चव्हाण नंदुरबार 
 हिवाळा आला आहे आणि हिवाळ्यात रोगराई टाळायची असेल तर आहार आणि खाद्यपदार्थांमध्ये बदल करा . त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहाल तर ताजेतवानेही व्हाल . हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते . गुलाबी थंडीने सुरुवात झालेल्या हिवाळ्यात आरोग्यात अनेक चढ – उतार असतात . त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो . असे आरोग्य तज्ञ सांगतात . सूक्ष्मजंतू च्या वाढीसाठी थंड हवामानअनुकूल असते .
     याशिवाय तापमानात घट झाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते . हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ सर्व लोकांना निरोगी आणि पौष्टिक आहाराची शिफारस करतात . हिवाळ्याच्या हंगामात रोग टाळण्यासाठी योग्य अन्न आणि पोस्टिक पदार्थ निवडणे खूप महत्वाचे आहे . चला जाणून घेऊया अशा पदार्थांविषयी , जे थंडीच्या मोसमात टाळावेत .
      आहार तज्ञांच्या मते , थंडीच्या मोसमात त्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे , ज्यांचा प्रभाव थंड असतो . यामध्ये नारळ पाणी , ताक , दही इ . हिवाळ्यात या गोष्टींचे सेवन केल्याने घसा दुखू शकतो , तर ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या मौसमी आजारांचा धोका असतो . म्हणूनच थंडीत गरम पदार्थ खा . उदाहरणार्थ , जेवणासोबत गूळ , टोमॅटोचा रस आणि इतर हंगामी भाज्या सुकामेवा इ .थंडी पडायला सुरुवात झाली की आपल्याकडे लगेच सुकामेवा , पौष्टीक लाडू यांसारखे पदार्थ खायला सुरुवात होते . सुकामेव्यात अक्रोड हा घटक ही महत्वाचा आहे . अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात . सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे . यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात . भिजवलेले अक्रोडखाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते – तुम्ही रोज अक्रोड खात असाल तर त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते . यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात . यामुळे आजारांपासून आपला बचाव होतो .
     अक्रोडमुळे वजन नियंत्रित राहते 
भिजवलेल्या अक्रोडचे नियमित सेवन केल्यानेही वजन नियंत्रित राहते . जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही नियमितपणे अक्रोड खात असाल तर ते तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे . अक्रोड खाल्ल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया वाढते , ज्यामुळे अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते .
    त्याच प्रमाणे सुकामेव्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्रास वापरला जाणारा घटक म्हणजे बदाम . आता हा बदाम आरोग्यासाठी किती फायदेशीर असतो याबाबत आपल्याला माहिती असते . पण हे बदाम कसे खावेत , कोणी , कधी , किती खावेत याचे काही नियम आहेत . हे नियम पाळल्यास बदाम खाण्याचे शरीराला अतिशय उत्तम फायदे होता . मात्र कोणत्याही वेळेला , चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्ल्यास त्याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो . त्यामुळे आहार घेताना त्याचे नियम , शरीरासाठी असणारे फायदे – तोटे , अतिसेवनामुळे होणारे परिणाम यांबाबत पुरेशी माहिती असायला हवी .
       नियमित बदाम खाल्ल्याने त्वचा , केस चांगले होण्यास मदत होते . बदामामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते , बदाम खाल्ल्याने हृदयरोग , मधुमेह यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते . दातांचे आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास बदाम उपयुक्त ठरतात . कच्चे बदाम हे पचनासाठी जड असतात , त्यामुळे ते थेट खाल्ल्यास पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो . हेच बदाम भिजवून खाल्ल्यास ते पचायला हलके होतात आणि त्याचा शरीराला चांगला फायदा होण्यास मदत होते .
      दिवसभरात कधीही बदाम खाण्यापेक्षा
सकाळी उठल्यावर किंवा ब्रेकफास्टच्या वेळी हे भिजवलेले बदाम खाणे केव्हाही फायद्याचेच ठरते . सकाळी त्यातील सर्व घटक योग्य पद्धतीने शरारीत शोषले जातात तसेच पोट भरल्यासारखे वाटते . एका दिवसात ६ ते ७ पेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत . त्यामुळे उष्णता वाढून त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात .
      मांस किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ हिवाळ्यात मांसासारखे खाद्यपदार्थ देखील टाळावेत .
 त्या पचायला शरीराला जास्त वेळ लागतो , असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे . ज्यामुळे शरीरात पचनाच्या समस्या आणि लठ्ठपणा वाढू शकतो . थंड हंगामात प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करण्याचा देखील सल्ला तज्ञांकडून दिला जातो
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *