नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या : एका इसमास ठोकल्या बेड्या.

Khozmaster
4 Min Read
प्रविण चव्हाण नंदुरबार 
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने 01 अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व 02 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमास ठोकल्या बेड्या.
  अधिक माहिती अशी कि,
 गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून गुजरात राज्याला लागुन असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयात देखील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे .
     नंदुरबार जिल्हयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी काही दिवसांपुर्वी नंदुरबार जिल्ह्यास भेट दिली होती .
        त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अवैध दारु वाहतुक , बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याचे  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांना निर्देश दिले होते . पोलीस अधीक्षक यांनी देखील अवैध दारु वाहतुक , बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते .
   तसेच  पोलीस अधीक्षक हे देखील स्वतः सर्व गोष्टीवर देखरेख ठेवून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करीत होते .
    दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री नंदुरबार शहरात मच्छी बाजारात एका इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्टल असून तो ते विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय  माहिती नंदुरबार विभागाचे उपविभागीय अधिकारी  सचिन हिरे यांना मिळाली .
   त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या,
    पो.निरीक्षक  कळमकर यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक सागर आहेर यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे दोन पथक स्थापन केली .
   सदर पथकांनी मच्छी बाजार परिसरात सापळा रचला असता मच्छी बाजाराजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालया शेजारी असलेल्या मोकळया मैदानातील पाण्याच्या टाकी जवळ एक इसम हा संशयितरीत्या फिरत असतांना दिसून आला .
     पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जावू लागला . त्यामुळे पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले .
     त्याचे नाव  पांडुरंग बाबुराव प्रजापती , (वय 56 )  रा . अहिल्याबाई विहीरी जवळ , कुंभारवाडा , नंदुरबार ता . जि . नंदुरबार.
 तसेच तो वांरवार त्याचे कमरेला हात लावत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी लागलीच दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 20,000 रुपये  किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन पिवळया धातुचे जिवंत काडतुसे मिळुन आले .
    सदरच्या वस्तू पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या .
     तसेच त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून त्याचे विरुध्द गु.रजि.नं. 744/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा . पो . का . कलम 37 ( 1 ) ( 3 ) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
    सदर कारवाई मुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्याची गय केली जाणार नाही , असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडुन इशारा  देण्यात आला आहे .
       सदर ची कारवाई, पोलीस अधीक्षक , नंदुरबार  पी . आर . पाटील  अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे नंदुरबार, उपविभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे  यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , पो.उपनिरीक्षक सागर आहेर , अतुल बिऱ्हाडे ,  जगदिश पवार ,  भटु धनगर , बलविंद्र ईशी ,  स्वप्निल शिरसाठ , अनिल बडे ,  विजय नागोडे ,  अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *