शहादा येथे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त , एकास अटक

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
शहादा शहरातून गावठी बनावटीचे एक पिस्तोल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 35 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे .
 याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार , शहादा शहरातून काल दि . 26 रोजी रात्रीच्या सुमारास गावठी बनावटीचे एक पिस्तोल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 35 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या घटनेतील संशयित आरोपी धीरज गणपत कुवर यास अटक करण्यात आली आहे .शहादा शहरातील प्रेस मारुती मैदानात गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *