चिखली
ऑगस्ट ते ऑक्टोंबर या तिन महिन्यात बुलडाणा जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीने शेतक-यांची पिकांची प्रचंड हाणी नुकसान झाल्याने शेतक-यांच्या हाता तोंडाषी आलेला घास निर्सगाने हिरावून नेला. शेतक-यांनी रात्रदिन जागुन मोठ मोठया रांगा लावुन पिक विमा काढला, मात्र केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने या विमा कंपन्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतक-यांना विम्याची रक्कम मिळाली नाही, शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला. विमा काढलेल्या ज्या शेतक-यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही अषा वंिचत असलेल्या शेतक-यांनी तात्काळ बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटी व तालुका कॉग्रेसकडे आपले तक्रार अर्ज सादर करावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारेे केले आहे.खरीप हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोंबर 2022 या तिन महिन्यात बुलडाणा जिल्हयात प्रचंड अतिवृष्टी झाली. यात जिल्हयातील शेतक-यांच्या सोयाबीन, कापुस, उडीद, मुग, फळबाग पिकांचे अतोनात नुकसान झाले. यात काही ठिकाणी तर जमीनीही खरडुन गेल्या. पिक, धान्य करपले तर काही ठिकाणी सडून गेले. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर जमीनीवरील शेतमालाचे नुकसान झाले. जिल्हयातील बहुतांष शेतक-यांनी आपल्या पिकाचा विमा काढुन घेतला होता. मात्र अनेक विमा कंपन्याकडुन शेतक-यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असुन त्यांना अदयापही पिक विम्याचे पैसे देण्यात आले नाही. राज्यातील शेतक-यांचा पिक विम्याचा प्रष्न अतिषय किचकट व जटील झालेला आहे, शेतक-यांना पिक विमा मिळून देण्यासंदर्भात केंद्रातील भाजपाची मोदी सरकार व राज्यातील षिंदे-फडणवीस सरकार योग्य ती भुमीका निभावत नसल्याने पिक विमा कंपन्यानी शेतक-यांची प्रचंड लुट चालविली आहे. एकंदरीत बुलडाणा जिल्हयातील पिक विम्यापासुन वंचित असलेला शेतकरी डबघाईस येवुन आर्थीक कांेडीत अडकला आहे. विमा काढलेल्या ज्या शेतक-यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही अषा वंिचत असलेल्या शेतक-यांनी तात्काळ बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटी व तालुका निहाय कॉग्रेसकडे आपले तक्रार अर्ज सादर करावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारेे केले आहे.
Users Today : 37