सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विटाळी येथील केली आत्महत्या…

Khozmaster
1 Min Read

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विटाळी येथील केली आत्महत्या…

नांदुरा :- (श्रीकांत हिवाळे) तालुक्यातील ग्राम विटाळी येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी गेल्या तीन-चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण थांबता थांबेना असं झालं त्याचाच एक भाग म्हणून नांदुरा तालुक्यातील मौजे विटाळी येथील शेतकरी उज्वल साहेबराव शिरसागर वय वर्ष ४५ या शेतकऱ्याने सततची होत असलेली नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली.

उज्वल क्षिरसागर या शेतकऱ्याकडे विटाळी शिवारामध्ये १ एक्कर शेती असून त्या शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे थकीत पीक कर्ज आहे.

बँकेचे असलेले पीक कर्ज कसे फेडायचे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेमुळे उज्वल क्षिरसागर या शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

खरंतर कबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाला दोन घास सुखाचे मिळत नसतील तर आपण जीवन जगायचे कसे व आपल्या लेकरा बाळांचे उज्वल भविष्य घडवायचे कशे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर नेहमी उभा राहतो.

अशा या परिस्थितीमध्ये सरकारने गरीब कुटुंबाच्या भावना जाणून या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *