प्रतिनिधी:-शिवाजी उदार मेरखुर्द
परीसरात यंदा झालेल्या परतीच्या पावसाने खरिपातील सर्वच पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून होते कि नव्हते झाल्याने शेतकऱ्यांना उसनवारी करून रब्बीची पेरणी करावी लागली आहे.
कष्टाने पिकवले मात्र परतीच्या पावसाने खरिपातील नुकसान झाले व आता शेतकऱ्यांच्या नजरा आता खरीपाच्या पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प मिळत आहे.परीसरात यंदा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी करण्यात आली मात्र हरभरा पिवळा पडुन मर लागली असल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जाण्याची चिंता व्यक्त होत आहे.हरभऱ्यासाठी मध्यम व भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी जिरायती हरभऱ्याची पेरणी सप्टेंबरच्या व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी बागायती हरभऱ्याची पेरणी करावी त्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास असलेल्या हवामानाचा पिकाला उपयोग होतो.रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना पैकी हरभरा एक महत्वाचे कडधान्य पिक म्हणून ओळख आहे.या पिकास शेती आणि मानवी आहारात महत्व आहे. या पिकासाठी मध्यम व भारी काळी जमिन निवडण नक्षत्रावर पिकांची लागवड करतात हरभरा पेरणी वेळेवर व चांगल्या व भारी जमिनीवर पेरणी साठी नियोजन करणे गरजेचे आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांना हरभराला लागलेली मर बाबत योग्य मार्गदर्शन करावा :- मनसेची मागणी.
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली परंतु या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.व उसनवारी करून रब्बीची पेरणी केली त्याच आता हरभरा पिक करून पंधरा ते विस दिवस होता असलेल्या हरभरा जमिनीवर चांगला दिसत असले तरी जे शेतकरी बारकाईने लक्ष देऊन पाहणी केली असता कि हरभरा पिवळा पडुन जळत आहे.यासाठि कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावा. अशी मागणी मनसेचे शिवाजी उदार यांनी केली आहे.
Users Today : 0