शहादा येथे घरफोडी करणारा सराईत  गुन्हेगार व एक अल्पवयीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या वेड्या , 03 गुन्हे उघड..

Khozmaster
4 Min Read
प्रविण चव्हाण नंदुरबार 
शहादा येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार  व एक अल्पवयीन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या वेड्या. 03 गुन्हे उघड..
       सविस्तर माहिती अशी की,
मागील काही दिवसांपासुन जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, शहादा, तळोदा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्द्तीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता,  जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते.पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आवाहन होते. त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत  पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
 वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेल मधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.दिनांक. 01 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, शहादा शहरातील सेवानिवृत्त शिक्षक शेख सगीर अहमद अब्दुल लतीफ यांचे घरातील इन्व्हर्टरची बॅटरी व मोबाईल चोरी करणारा सराईत आरोपी अरमान शेख याने केलेली आहे, त्यावरून  पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. एल. सि. बि च्या पथकाने शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात सापळा लावित . दिनांक. एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या  सुमारास एक संशयीत इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून पळू लागला, म्हणून  पथकाला संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले.  अरमान मुख्तार शेख (वय-28)  रा. गरीब नवाज कॉलनी शहादा. त्यास इनव्हर्टर व मोबाईल चोरी बाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला म्हणून त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने चोरी केले बाबत सांगितले. त्यास चोरी केलेले इनव्हर्टर व मोबाईल बाबत विचारले असता त्याने त्याचा एक अल्पवयीन यास दिल्याचे सांगितल्याने अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून मोबाईल कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यास बॅटरी बाबत विचारले असता त्याने सदरची बॅटरी एका भंगार विक्रेत्याला खोटे बोलून दिल्याचे सांगितल्याने शहादा शहरातील भंगार विक्रेत्याकडून सदरची बॅटरी देखील हस्तगत करण्यात आलेली आहे.तसेच ताब्यात घेण्यात आलेला अरमान शेख यास अधीक विश्वासात घेवून विचारले असता त्याने 10 ते 12 दिवसापूर्वी गरीब नवाज कॉलनीतीलच एका दुमजली घराचे कुलुप तोडून घरातील 50 हजार रुपये चोरी केल्याचे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे गुन्ह्यातील चोरी केलेले 50 हजार रुपयांपैकी 7100/- रुपये मिळून आले व उर्वरीत पैसे खर्च केले  असे सांगितले. तसेच सुमारे 9 ते 10 महिन्यापूर्वी एका टायरच्या दुकानाचे कुलुप तोडून तेथून देखील 50 हजार रुपये रोख चोरी केल्याची कबुली दिली. त्याबाबत शहादा पोलीस ठाणे येथील अभिलेखाची पडताळणी केली असता शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.ताब्यात घेण्यात आलेला अरमान मुख्तार शेख (वय-28)  व एक अल्पवयीन यांचेकडून 02 घरफोडी व 01 चोरीचा गुन्हा उघड होवून त्यांच्या ताब्यातून एकुण 25,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
     सदर ची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर, सहा. पो. निरीक्षक  संदीप पाटील, पो. उप निरीक्षक  अनिल गोसावी, पो. हवालदार दिपक गोरे, पो. नाईक पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरेे, पो. शिपाई किरण मोरे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली आहे
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *