आपल्याकडे रेशनच्या दुकान वर केल्या जाणारा धान्याचा गैरव्यवहार सर्व परिचित आहे दुकान मालक रेशन कार्ड धारकाला त्याला सरकारकडून मिळणाऱ्या धान्यापेक्षा कमी धान्य देते हे स्वतः रेशन कार्ड धारकाला माहित असतानाही त्याला त्याबद्दल विशेष काही करता येत नाही त्याला किती धान्य मिळणार यासंबंधी त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला दुकानदारासमोर नेहमीच नमते घ्यावे लागते पण राज्य सरकारने यावर एकप्रकारे तोडगा काढला आहे.
आता तुमच्यासाठी ठरलेल्या धान्याच्या कोठ्यातून तुम्ही किती धान्य घेतले या बद्दल माहिती देणारा एसएमएस तुम्हाला मिळणार आहे सध्या सरकारकडून रेशन कार्ड वर नमूद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार जोडण्याचे काम सुरू आहे.
राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये हे काम प्रगतीपथावर आहे बहुतांश जिल्ह्यात त्याचे प्रमाण 95 टक्क्यापुढे गेले आहे रेशन कार्डला आधार जोडल्याने कुटुंबातील व्यक्तींची नेमकी संख्या कळुन त्यांना त्यानुसार धान्य वाटप होईल.त्यामुळे दोन रेशन कार्डवर नाव असणाऱ्यांची नावे वगळी आहे.त्यामुळे धान्याची बचत होत असून सरकारला हे जोडले जात आहेत.यासाठी ग्राहक पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी बुधवारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात हा निर्णय तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिलेल्या आदेशानुसार कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी जोडला जाईल या क्रमांकावर त्या कुटुंबाच्या सदस्य संख्येनुसार एकूण देय धान्यसाठा आणि आतापर्यंत खरेदी केलेल्या धान्याचे प्रमाण यासंदर्भात माहिती देणारा संदेश येईल. यातून रेशनच्या दुकानावर होणारा भ्रष्टाचार कमी होईल
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख
Users Today : 54