जेलची खिडकी तोडून 5 आरोपी फरार.. एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश..

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉकअपची खिडकी तोडून पसार.
        तालुक्याचा सर्व सीमा सील करण्यात आल्या आहे.
नवापुर पोलीस ठाण्याच्या जेल मध्ये अटकेत असलेले दरोड्याच्या गुन्ह्यातील 5 आरोपी तुरुंगाची खिडक्या तोडुन फरार झाल्याची माहीती समोर येत आहे .
          यापैकी एकास गुजरात पोलीसांनी पकडले असुन उच्छल पोलीस ठाण्यात  आणण्यात आले .
       नवापूर पोलीस ठाण्यातील जेल मध्ये एका दरोड्याच्या गुन्ह्यात 5 जणांना आज  सोमवार 5 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान त्या आरोपींना अटक करून पुरुष जेल मध्ये ठेवण्यात आले होते . मात्र जेल च्या मागच्या भिंतीला असलेल्या खिडकीची गज तोडुन हे आरोपी आज सकाळी 8  वाजेला फरार झाले आहे . खिडकी तोडून त्यांनी पलायन केल्याचे पोलिसांना आढळून आले .
    नवापूर पोलीस ठाण्याची जेल असलेली इमारत ही ब्रिटिश कालीन  जुनाट असून . पाच ही आरोपी हे खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयन वरच पोबारा करीत हे आरोपी ऊसांच्या शेतामध्ये फरार झाले आहेत .
       पोलीस यांच्या मागावर असुन ज्या उसाचा शेतात आरोपी फरार झाले आहेत . त्या शेताला पोलीसांनी विळखा देखील टाकला आहे .
    प्रत्यशदर्शी उसाच्या शेतातील गुराखी आणि शेतकरी यांनी या घटने बाबत माहीती दिली आहे .
      दरम्यान यापैकी एकास गुजरात पोलीसांनी पकडले असुन उच्छल पोलीस ठाण्यात आनन्यात आले.
  दरोड्याच्या गुन्ह्यातील 5 हि आरोपीचे  फोटो पोलीसांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत .
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *