ऊपेक्षित पारधी समाज आणि त्यांना लागलेला शिक्का धुवुन काढण्याची जबाबदारीतून अपन पळ काढतोय का????
तसे पाहिल्यास भटक्या विमुक्त जाती मध्ये येणारा हा पारधी समाज आजही भारतात महाराष्ट्र राज्यात उपेक्षित आहे. आम्ही ते राहातात तेथील जंगल जमीन विकासाच्या नावाने नेस्तनाबूत केली पाल पारधी फाशे पारधी या जमातींवर आम्ही सुध्दा कायमचाच शिक्का मारून टाकलाय की ही मंडळी चोर आहेत आणि चोऱ्या करतात ना कधी रेशन कार्ड नाव लावल ना कधी आधार कार्ड वर नाव घातल. ठीक आहे पोलीस रेकॉर्ड नुसार काही मंडळीन ने गुन्हेगारी कृत्य केले आसेल म्हणून सागळ्या जमातीतील लोकांना दोष देऊन काय उपयोग मला चांगलेच आठवतेय आमच्या गावात पांढरी मंदीर परीसरात आणि पारधी समाजातील लोकांनीच वस्ती आसायची परंतू त्यांनी कधीच चोरी आमच्या परीसरात केली नाही.भाजीपाला वगैरे कदाचीत नेत आसत कधी मधी नंतर आमच्या शेतात म्हणजेच( बराडा )मध्ये सखाराम पारधी व त्याची आई सखुबाई आणि बहीण मुक्ता व 50 लोकांचा परिवार होता.एकच कार्यक्रम मायी वाढ ना भाकर कुटके माघायचे आणि गुजराण करायचे आम्हास कधीच ञास झाला नाही दिला नाही.उलट 30 ते 35 वर्षांपूर्वीची गोष्ट आसेल मी सरास दुपारी जेवन सखुबाई सोबत त्यांच्या पालावर करायचो आणि त्यानी मीठ लावून भाजलेले कुटके खुप छान लागत हेच नाहीत तर माझ लग्न जमल्यावर सखाराम आणि त्याच्या आईला मुळ पञिका दिली होती.पुन्हा काही दिवस ते आमच्या गावात आसनार्या गोरक्षण मध्ये राहु लागले परंतू त्या वेळेस सुध्दा मला बर्याच जनाच्या विरोधास सामोरे जावे लागले. नंतर त्यांनी मला विनंती केली माणिक भाऊ आम्ही आर्वी सोडतोय आणि ते कमलापुर (पुर्णा)तालुक्यातील गावातील गायरान येथ स्थायिक झाले.तिथ सुध्दा त्या गायरान जमीनीवर कोणच त्याना धंदा करुन देत नहोते मी माझ टॅक्टर देतो म्हटल सखाराम नको म्हटला आमच्या मुळ तु वैर घेवु नकोस म्हणून सांगीतल.नंतर तिथ एक दिवस मुक्काम केला तर सगळेच पुरुष बाया माझ्या भोवताल राञ भर पाहारा देवुन उभे होते.येवढी ही मयाळु जमात आणि समाज याना का दुर सारतोय आता चोरी हा धंदा या लोकांनी कधीच बंद केलाय ईतर मंडळीन हा धंदा सुरु केलाय पातक माञ त्या समाजावर मारता.बिड जिल्ह्य़ात काल झालेली घटणा हेच सांगुन जाते की आम्ही पारधी समाजातील लोकांना स्वीकारनारच नाहीत म्हणजेच जग कुठ जातय आम्ही कुठ आहोत.याचा विचार झाला पाहीजेत. मला आलेला अनुभव मी 30 वर्षापुर्वी परभणीतील मार्केट कमिटीत बैठक लावली एका आंदोलनासाठी शेतकरी कोण येणार नाहीत म्हणून सखाराम ला फोन केला त्यानीच 50 महीला 30 पुरुष आणि लेकर घेऊन आला.योगायोग त्या बैठकीत शेतकरी सुध्दा जास्त आले आणि मग हाॅल भरगच्च भरला परंतु सगळ्यानेच चप्पल आत मध्ये सोडले म्हणून शिपायाने ते एका थैलीत भरले आणि बाहेर नेवून शेड वर ठेवले तो गेला तर आलाच नाही.आणि नंतर बैठक संपली चपला गायप सगळ्यानेच माझी लाखोळी काढली शेतकर्यांच्या बैठकीत पारध्याच काय काम मी शांत बसलो आणि नंतर पाच वाजता तो शिपाई माझ्या मोटारसायकल जवळ आला आणि माणिकराव त्या चपला शेड वर आहेत म्हटला.
म्हणजेच माझ्याच अनुभवातून हे सांगतोय चला घर बदलु मग समाज बदलेल थोडा वेळ लागेल परंतु पारधी समाजातील लोक प्रवाहात नक्कीच येतील.
योगायोग कमलापुर चा सरपंच पारधी समाजातील
झालाय ही साधी गोष्ट नक्कीच नाही. म्हणून सांगतोय भविष्यात पुन्हा महाराष्ट्र राज्यात आंदोलन कर्ते वेळेस कोणाचाच बळी जावु नये पेपरात बातम्या येतात व जातात पुढ काय!
माणिक कदम (चुक भुल माफी आसावी माझ व्याकरण कमी आहे)8208151327/9420622531
Users Today : 0