सेनगाव तालुक्यातील शासकीय जमिनीवर विविध उद्योग उभारणीसाठी उद्योग मंत्र्यांना तसेच अन्य मंत्र्यांना दिलेली निवेदन

Khozmaster
2 Min Read
सेनगाव तालुक्यातील आम आदमी पक्ष तालुकाप्रमुख बालाजीभाऊ देशमुख यांनी हिंगोली जिल्ह्यामधील तसेच सेनगाव तालुक्यातील शासकीय जमिनीवर विविध उद्योग उभारणीसाठी उद्योग मंत्र्यांना तसेच अन्य मंत्र्यांना दिलेली निवेदन हिंगोली जिल्हा हा अतिशय दुर्गम भाग असून या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हिंगोली जिल्हा हा भारतरत्न राष्ट्रपती नानाजी देशमुख यांचे जन्मगाव असलेला जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे.परंतु भारतरत्न नानाजी देशमुख यांचे गाव सेनगाव तालुक्यातील कडोळी या गावांमध्ये कुठल्याच प्रकारची विविध विकास कामे झालेली नाहीत त्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून राष्ट्र ऋषी नानाजी देशमुख यांच्या स्मारकाचा प्रश्न सुद्धा गुलदस्त्यात आहे.परिसरातील सुज्ञ नागरिकाच्या मागणीनुसार भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्मभूमी मध्ये विविध उद्योग तसेच सांस्कृतिक भवन तसेच आरोग्य विभागाची इमारत तसेच शाळेची इमारत अशी कामे प्राधान्याने करून सेनगाव तालुक्यामध्ये तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये असलेल्या शासकीय जमिनीवर छोटे छोटे उद्योग उभारून त्या उद्योगामार्फत भूमिहीन अल्पभूधारक शेतमजूर तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक अशा लोकांना रोजगार निर्मिती करून त्यांना उदरनिर्वाह करण्याचे साधन उपलब्ध करून द्यावे

जेणेकरून सततच्या नापिकीमुळ होणाऱ्या आत्महत्या थांबून रोजगार उपलब्ध होईल तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व समाजातील घटकांना समान काम मिळावेतसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून द्यावी अशी सुद्धा निवेदन सेनगाव आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख बालाजी भाऊ देशमुख यांनी थेट पंतप्रधान तसेच अन्य मंत्र्यांना स्वतः जाऊन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामाकरिता निवेदन दिले आहेत.

नानाजी देशमुख यांच्या जन्मभूमी मध्ये विविध उद्योग उभारून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मिती करून देण्याचा शब्द माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला होता.तसेच या परिसरामध्ये मोठे मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार असल्याचे सुद्धा सांगितले होते परंतु अद्याप पर्यंत कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे वरील सर्व मंत्र्यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन हिंगोली जिल्ह्यांमध्ये विविध उद्योग उभारावे ही प्रशासनास विनंती आहे.
0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *