चाकूचा धाक दाखवून मोबाईल , रोकड लांबविली..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार 
नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरास दुचाकीने आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोकड असा सुमारे २३ हजाराचा ऐवज लांबवून नेल्याची घटना घडली .
      याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील धनराट येथील पाऊल धनाजी गावित हे नवापूर शहराजवळील नवापूर ते पिंपळनेर रस्त्याने दुचाकीने नांदवन येथे जात होते . यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पाऊल गावित यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेला ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व १५ हजार ६३० रुपयांची रोकड असा एकूण २३ हजार ६३० रुपयांचा ऐवज लांबवून चौघे अनोळखी दुचाकीने पसार झाले .याबाबत पाऊल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघा अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम ३ ९ २ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
    पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत .
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *