शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
कार्यकारी अभियंता,धुळे मध्यम प्रकल्प विभागी पथक यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील  रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प, 33 लघु प्रकल्प, को.प.बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण 62 व जिल्ह्यातील अधिसूचित नदी-नाले तसेच पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी बागाईतदारांना 14 ऑक्टोबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीकरीता सुरू झालेल्या रब्बी हंगाम 2022-2023 साठी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा,डाळी, कपाशी, भुईमूंग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज  क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे  एन.एम.व्हट्टे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग,धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *