सव्वा लाखाचे अवैध लाकुड जप्त..

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
नर्मदा किनाऱ्यावर असलेल्या पौला गावाजवळ वनविभागाने १ लाख २३ हजार ५४० रुपयांचा मुददेमाल केला आहे.सविस्तर माहिती अशी की , दि . ५ डिसेंबर रोजी गुप्त बातमीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी अक्राणी ( प्रा . ) व रेंज स्टॉप अक्राणी व , बिलगाव रेंज स्टाफ सह माकडकुंड परीमंडळातील माकडकुंड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२५ मधील नर्मदा नदीच्या लगत पौला गावाच्यापासून थोड्या अंतरावर अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या साग दांडी , साग बेलखे , खैर प्रजातीचे सालिसह व विनासालीसह घडतड केलेला बेवारस लाकूड साठा वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ताब्यात घेतला .
        यात साग एकूण ४.८० घनमीटर माल किंमत ९ ६ हजार ४०७ रूपये व खैर एकूण १.३७३ व माल किंमत २७ हजार १३३ रूपयांचा घनमीटर माल जप्त केला आहे . असा एकूण १ लाख २३ हजार ५४० रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतल्याने लाकूडतस्कारांमध्ये भीती निर्माण झाली आहे . वन विभागाने नर्मदा नदी किनारी अतिशय दुर्गम भागात नर्मदा नदी मधून सदर माल बार्ज साह्याने पौला येथून नदीकिनारी वाहतूक करून पुन्हा खाजगी वाहनाने वाहतूक करून धडगाव टिंबर डेपोत जमा केला . सदरच्या गुन्हा हा वनरक्षक माकडकुंड यांनी नोंदविला .
    सदर कार्यवाही वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार , नंदुरबार उपवनसंरक्षक के.बी.भवर , व सहाय्यक वनसंरक्षक अक्रानी एस.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अक्रानी सौ.सी.ए. काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड बी . एम . परदेशी , वनपाल धडगाव एन . डी . पवार , वनरक्षक डी . एफ . पावरा , जी . बी . तडवी , आर.झेड . पावरा , ए . एस . पाडवी , एम एम . वळवी , एच.टी. तडवी ,  बी.के. वसावे व बिलगाव वनक्षेत्रातील वनरक्षक एस.बी.भंडारी , एम . एच . तडवी , पी.एफ. पाडवी , व्ही . जी . पटले , यु.सी. पावरा , अनिल पावरा ,  जे . आर . पावरा , एम.एन .पावरा , पी.जे.पावरा तसेच अक्रानी , व बिलगाव क्षेत्रातील वनमजूर जेरमा पटले , बारदा पटले , ओरजी वळवी , मगन
पटले , भिका पाडवी , दारख्या पटले , जयवंत पावरा , बिजला वळवी , खेमसिंग वसावे , खात्या पाडवी , शिवाजी पाडवी , संजय पराडके वाहन चालक हेमंत पावरा इत्यादींनी कारवाईत सहभाग घेतला असुन,
  पुढिल तपास वनपाल माकडकुंड करित आहे .
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *