लॉकअप तोडून फरार आरोपींसाठी दुसऱ्या दिवशीही सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी.

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्याच्या गुन्ह्यातील बंदी असलेले पाच आरोपी खिडक्या तोडून दि .५ रोजी फरार झाल्याची घटना घडली होती . फरार झालेला एका आरोपीला उच्छल ( गुजरात ) पोलिसांनी पकडले होते.महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात नंदुरबार पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून लॉकप तोडून फरार झालेले उर्वरित चार आरोपींच्या शोध आज दुसऱ्या दिवशी ही सुरू आहे.नवापूर तालुक्यातील कोठडा रस्त्यावर दरोड्याच्या गुन्हयाखाली नवापूर पोलीसांनी हैदर ऊर्फ इस्राईल ईस्माईल पठाण ( वय २० वर्षे , रा . कुंजखेडा , ता . कन्नड , जि . औरंगाबाद ) , इरफान ईब्राहीम पठाण ( वय ३५ , रा . ब्राम्हनी – गराडा , ता . कन्नड ) , युसूफ असिफ पठाण ( वय रा . ब्राम्हनी २२ , गराडा , ता.कन्नड , जि . औरंगाबाद ) , गौसखों हानिफखाँ पठाण ( वय ३४ , रा . ब्राम्हनी- गराडा , ता . कन्नड , जि.औरंगाबाद ) ,अकिलखों ईस्माईलखाँ पठाण ( वय २२ , रा . कठोरा बाजार , ता . भोकरदन , जि . जालना ) या पाच संशयीतांना त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेतले होते . त्यांच्या वाहनामध्ये हत्यारे , मिरची पावडर आढळले . त्याना पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते . मात्र , काल सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेल्या लाकडी खिडकीची गज तोडून ते पाचही आरोपी फरार झाले . खिडकीतून उड्या मारत चड्डी बनीयनवरच पोबारा काढत हे आरोपी ऊसांच्या शेता मध्ये फरार झाले होते.” मात्र आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत या चार पैकी एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही . या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे . गुजराथ राज्यातील उच्छल व महाराष्ट्र हद्दील नवापूर या सिमा भागावर पोलिस प्रत्येक वाहणाची कसुन चौकशी करण्यात येत आहे . यात दि ५ रोजी पकडला गेलेला आरोपी हैदर उर्फ इस्त्राईल पठाण ( वय २० ) रा कुंजखेडा ता . कन्नड , जि . औरंगाबाद याला आज नवापूर न्यायलयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *