राज्यनाट्य स्पर्धेत भाजपचा वाढता हस्तक्षेप…!!! बाबासाहेब पाटील
मुंबई (संजय धाडवे)
महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपासून ६१ वा राज्यनाट्य
महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली सुरू केलेला हा नाट्य महोत्सव महाराष्ट्रातील हौशी रंगकर्मींना व्यावसायिक रंगभूमी व चित्रपटांत संधी देणारा ठरला आहे. गेली ६१ वर्ष सदर स्पर्धा जल्लोषात होत आहे. तब्बल १९ केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत हजारों कलावंत, लेखक,दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ सहभाग घेत आहेत. मराठी, हिंदी, बालनाट्य आणि संस्कृत, संगीत नाट्य स्पर्धा देखील घेतल्या जातात. गेल्या सात-आठ वर्षात मात्र या स्पर्धेच्या संयोजनात भारतीय जनता पक्षाचा संस्कार भारती ‘या ‘नाट्य व साहित्य विधा शाखेमार्फत प्रचंड हस्तक्षेप होत आहे.त्यांनी स्पर्धेच्या परिक्षकांची सूची संचालनालयास पाठवली होती असे समजते : भाजपच्या मर्जीतील,विचारधारा मानणारे व कार्यकर्ते अशांची नेमणूक परीक्षकपदी करून त्यांच्या विचारधारेच्या ‘नाटकांना, स्पर्धकांना पारितोषिके देण्याबाबत यशस्वी प्रयत्न केले. विरोधी विचारधारा
मांडणाऱ्या नाटकांना व स्पर्धकांना डावलले.
नियोजित पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे व शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचपुरोगामी विचारांची मांडणी असलेल्या नाटकांचे खच्चीकरण करण्याचे अश्लाघ्य कार्य अंमलात आणले जात आहे.
यंदातर कहरच झाला आहे. शासनाच्या सांस्कृतिकार्य संचालनालयाने राज्यभरातील केंद्रांवर नियुक्त केलेले
स्पर्धा समन्वयक बदलण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.स्पर्धा अगदीच तोंडावर आल्याने हा प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाला नाही. मात्र काही ठिकाणी भाजपप्रणित उपसमन्वयक
आहेत. पुढील वर्षी राज्यभरातील सर्व समन्वयक, परीक्षक भाजप प्रणित असतील असा घाट भाजपाने घातला आहे.यंदाही अनेक स्पर्धेचे परिक्षक ‘ आपल्या सोयीचे विचारधारेचे ‘नेमण्याचे कृत्य त्यांनी केले आहे.
आगामी एकदोन महीन्यात रंगभूमी व चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, नाटक व चित्रपट सेन्सॉर), व्यावसायिक व प्रायोगिक नाट्य अनुदान समिती इत्यादी अनेक ठिकाणी अशासकीय सदस्य पदी भाजपच्याच विचारसरणीची माणसे विविध विभागामार्फत निवडल्या जातील असे सध्या चित्र दिसते….आपल्याला न पटणारी विचारधारा मांडूनच दयायची नाही, कोणी विचारधारा मांडलीच तर ती विचारधारा,ती मांडणारी संस्था व प्रसंगी विचार मांडणारा व्यक्ती संपविण्याचा कुटील,व सनातनी डाव भाजप खेळतेय भाजपच्या अर्थात् विद्यमान सरकारचा या कलाक्षेत्रातील वाढत्या हस्तक्षेपाचा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग जाहीर निषेध करीत आहे.शासनाने हा मनमानी व हुकुमशाही कारभार त्वरीत थांबवा वा अन्यथाया गैरप्रकाराविरुद्ध राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा राष्ट्रवादी चित्रपट, व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.