अमेरिकेने कितीही प्रगती केली असली तरी भारत हाच सर्वश्रेष्ठ चिखली

KHOZ MASTER
4 Min Read
चिखली
अमेरिका अतिशय प्रगत देश . साऱ्या जगावर हुकूमत असलेला देश . अशा या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे महावाणिज्य दुतावासा तर्फे इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्राम (IVLP) च्या अंतर्गत “लीन इन(डिया) – पाश्चात्य आणि मध्य भारतातील महिलांचे सशक्तीकरण या विषयावर अमेरिका दूतावासाचे सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मला अमेरीका पाहायला , वाचायला आणि अनुभवाला मिळाली. अमेरिका प्रगत असली तरी याठिकाणी सुद्धा मोठया प्रमाणावर गरिबी , बेरोजगारी आहे . ज्या समस्या माझ्या देशातील नागरिकांना आहे त्याच समस्या अमेरिकेत सुद्धा मला दिसल्या . अमेरिके सोबतच मी या अगोदर बरेच देश बघीतले आहे. भारत आणि अमेरिका अशी तुलना केल्यास अमेरिकेने कितीही प्रगती केली तरी भारत हाच सर्वश्रेष्ठ देश असल्याचे स्पष्ट मत आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी त्या अमेरिकेचा दौरा आटोपून आल्यानंतर झालेल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना व्यक्त केले.आ सौ श्वेताताई महाले पाटील यांचे मातृभूमीने केले भव्य स्वागत आणि सत्कार दि 6 डिसेंबर रोजी श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अमेरिकेच्या दौऱ्यावरून काल 5 डिसेंबर रोजी भारतात, महाराष्ट्रात आणि  चिखली मतदारसंघात परत आल्याबरोबर  मातृभूमीतील जनतेच्या वतीने आज 6 डिसेंबर रोजी ताईंचे भव्य स्वागत आणि जाहीर सत्कार करण्यात आला.त्या पुढे म्हणाल्या की,व्यसनाधिन तरुण पिढीला बाहेर काढण्याचे अमेरिकेसमोर व्यसनाधीनता अमेरिकेला जडलेला मोठा रोग आहे. अमेरिकेमध्ये प्रचंड बेरोजगारीमुळे तेथील तरुण पिढी नैराश्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन कडे झुकलेली आहे.  त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे अमेरिकेसमोर मोठे आव्हान असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविलेअमेरिकेला सावरण्यात भारतीयांचे मोठे योगदान भारतीयांच्या बौद्धिक कौशल्यास मुळे अमेरिकेने मोठी प्रगती केलेली आहे . अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात राहत आहे .भारतीय लोकांमधील प्रामाणिकता,नैतिकता आणि बौध्दीक क्षमतेमुळे अमेरिकेच्या विकासात मोलाची भर टाकलेली आहे. तेथील भारतीयाने आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक क्षेत्रे केलेली आहे. अमेरिकेची अर्थ व्यवस्था सुद्धा बऱ्याच अंशी भारतीयांवर अवलंबून आहे. भारतीय संस्कृती सुद्धा अमेरिकेत फैलावत असून अमेरिकेला प्रत्येक बाबतीत सावरण्यात भारतीयांचे मोठे योगदान असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.सज्ञान झालेल्यांना दिलेले स्वातंत्र्य हेच तरुण पिढी व्यसनाकडे वळण्याचे कारण अमेरिकेमध्ये मुले अठरा वर्षाची झाली त्यांना कायदेशीर स्वातंत्र्य तर मिळतेच परंतु घरगुती स्वातंत्र्य मुळे मुले स्वैर झालेली आहे. कायदा आणि कौटुंबिक स्वातंत्र्य मुळेच अमेरिकेतील युवा पिढी व्यसनाकडे वळलेली असल्याचे दिसत असल्याने प्रत्येक कुटुंबाने मुलांना मर्यादेतच स्वातंत्र्य देऊन मुले व्यसनी होणार नाहीत याकडे जातीने लक्ष देण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. यासोबतच अमेरिकेमधील  राजकिय , सांस्कृतिक , सामाजिक , व्यापारिक, औद्योगिक व शेती विषयक बाबतीत आ सौ श्वेता ताई महाले यांना आलेले अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी, प्रदेश सदस्य, माजी, आजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्या, युवा मोर्चा, महिला मोर्चा व सर्व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.या सोहळ्याचे आयोजन भाजपा चिखली शहराध्यक्ष वतीने करण्यात आले होते..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुरेन्द्रजी पांडे हे होते तर श्री. पंडितदादा देशमुख, डॉ प्रताप सिग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, तालुकाध्यक्ष श्री. कृष्णकुमार सपकाळ, श्री रामकृष्ण दादा शेटे अध्यक्ष शी प्रसारक मंडळ, ॲड मंगेश व्यवहारे,  देवीदास पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,सौ विमल ताई देव्हडे , रामदास भाऊ देव्हडे,तालुकाध्यक्ष ॲड. शेख अनिश भाई, सुहास शेटे माजी नगराध्यक्ष,श्री. सुनील देशमुख, शिवराज पाटील,भाजपा महिला मोर्चा चिखली शहराध्यक्षा सौ. सुनिताताई भालेराव, भाजपा महिला मोर्चा, चिखली तालुकाध्यक्षा सौ. द्वारकाताई भोसले, सौ निताताई सोळंकी तालुका अध्यक्ष भाजप महीला किसान आघाडी,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. सागर पुरोहित, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, श्री. संतोष काळे पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. योगेश राजपूत , सलीम परवेझ, श्याम वाकदकर , ॲड संजय सादर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
0 9 7 1 5 7
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *