मातृशक्तीचा अवमान जेथे होतो ,तेथे दुःखाची छाया उत्पन्न होते,- महंत परमानंदगिरी महाराज

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर भारतीय संस्कृतीने नेहमी स्त्री शक्तीचा सन्मान केलेला आहे,नारी शक्तीचा जेथे सन्मान होतो तेथे देवी-देवताचे अस्तित्व असते म्हणून समाजातील प्रत्येकाने नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे,जेथे मातृशक्तीचा अवमान होतो ,तेथे सदा न कदा दुःखाची छाया असते असे अमृत वचन भांगसी माता  गड-शरणापूर चे
मठाधिपती श्री,श्री,१००८,महामंडलेश्वर  स्वामी परमानंदगिरी जी महाराज यांनी बुधवार(ता,०७)रोजी वैजापुरात केले,राष्ट्रसंत जनार्दन  स्वामी महाराज यांच्या३३ व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात परमानंदगिरी महाराज भक्तांना आपल्या
प्रवचनातून सांगत होते, ते पुढे म्हणाले की,आज समाज मन कमालीची संकुचित होत आहेत,समाज–
मनात विकार व व्यसन घर करून आहेत , अशा समयी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा संदेश मानवसेवा
करण्याचा व समाज मन जोडून विधायक दृष्टी समाजाला देण्यासाठी धार्मिक कार्य व संतांचे प्रबोधन उपयुक्त ठरतात असेही ते पुढे म्हणाले,या प्रसंगी प,पू,दत्तगिरीजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले,
प्रास्ताविक व सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,या प्रसंगी,ज्ञानानंदगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब पा, चिकटगावकर,सचिन वाणी, राजेंद्र पा,साळुंके,डॉ,सुभाष भोपळे, डॉ,बाबासाहेब इंगळे रमेश हडोळे,राजू जोगीलाल राजपूत,भावलाल सोमासे ,बापू गावडे,सर्वश्री वाघ,पुतळे,मोटे पाटील,अरविंद साळुंके,दाणे पाटील,शंकर मुळे, संगीता पुतळे,मंदा गायकवाड, आशा महाजन,मोटेताई यांची उपस्थिती होती,(बाबाजींच्या ३३व्या पुण्यस्मरण निमित्त जमलेला समुदाय)
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *