प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा*
कृषी बातमी
जयजवान जयकिसान सैनिकमित्र फाउंडेशन MCL GAPCL समूहासोबत आता शेतकऱ्यांची समूह बांधणी करून प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे प्रकल्प उभारून तालुक्यामध्ये मोठा प्रकल्प उभारण्यास तयार. झिरो बजेट खर्च गवत शेती, काडी कचरा पालापाचोळा मक्का कडबा कुट्टी भूस शेण गोमूत्र ड्रेनेज वेस्ट ( दगड माती आणि काच सोडून) सर्व बायो वेस्ट जाळू नका, फेकू नका सर्व काही विकते फक्त ग्रुप समूहाने संग्रहित करा व विकसित तंत्रज्ञान, गुंतवणूक ,उत्पादन ची प्रक्रिया समजून घ्या, महिला बचत गटांसोबत शेतकरी गटांसोबत तालुक्यातील प्रत्येक गावोगावी बैठक घेण्यात येत आहे. राजरोसपणे गावात दवंडी देऊन किंवा स्पीकरवर पुकारून सार्वजनिक ठिकाणी बैठक घेतल्या जाते, व होतकरू कुशल काम करणाऱ्या प्रथम येणाऱ्या प्रथम दिल्या जाते. धन दांडग्यांच्या घरी न जाता कष्टकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. कृषी क्षेत्रात गेल्या दशकात शेतकरी समूहाची चांगली बांधणी होत आहे त्यातून छोटे मोठे प्रकल्प उभे करून विज्ञानाचा उपयोग घेऊन जय जवान जय किसान नाऱ्याला न्याय देण्याची वेळ आता आलेली आहे ती आपल्या संघटनातून प्रत्येकाला दिसेल असे सैनिकमित्र फाउंडेशन सैनिकमित्र भिमराव चाटे व कंपनी सि ओ गणेश काकड यांनी सांगितले.
1 प्रत्येक सदस्याला किमान दरमहा ५०००रु. उत्पन मिळवीण्यासाठी कंपनी कटीबध आहे.
2 जे शेतकरी आधीच शेती करीत आहेत, त्यांना रासायनिक शेतीपासून सेंद्रिय शेती करण्यामध्ये बदल करण्यास मदत करेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन वाढण्यास मदत होईल.
3 ज्या कुटंबाकडे जमीन नाही त्यांना करार पध्दतीने जमिन उपलब्ध करून देण्यात येईल.
4 प्रत्येक सदस्यांना व्यवसायीक विकास योजनेतून उत्पन मिळविण्यास हातभार लावेल.
5 सभासदांना व त्यांच्या कुंटुबाला रोजगार निर्मीती प्राप्त होणार आहे.
Users Today : 23