प्रविण चव्हाण
नंदुरबार -: मोटर सायकल चोरी करणारे दोन संशयीत आरोपीना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या ,
सविस्तर माहिती अशी कि,
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता , नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतुन मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत . त्यामुळे पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आवाहन होते .
त्याअनुषंगाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन दुचाकी चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत,
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले .
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारे ठिकाण , वेळ दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची माहिती घेवुन रेकॉर्ड वरील जेल मधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणा वरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते . तसेच आपले खबरी मार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते .
दिनांक 03 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की , नंदुरबार शहरात नवापूर चौफुली परीसरात दोन इसम कागदपत्र नसलेले मोटर सायकल कमी किंमतीत विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली .
पो. निरीक्षक खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखे चे एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते नियोजन करून सापळा लावण्याचे आदेश देवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या . पथकाने तात्काळ नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परीसरात जावून खात्री केली असता एका पान टपरी जवळ दोन इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून आले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना दोन्ही संशयीत इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला , परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा ना ताब्यात घेतले . ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयीत.
निलेश हसीराम कोकणी (वय22) रा . झामट्यावड ता . नवापूर जि . नंदुरबार,
राकेश दिलवर कोकणी (वय21) रा . बिजादेवी ता . नवापूर जि . नंदुरबार असे सांगितले .
त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करत त्यास स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय नंदुरबार येथे आणुण अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की , त्यांनी सदर ची मोटार सायकल सुमारे विस ते पंचवीस दिवसापूर्वी नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालय परिसर येथून रात्रीच्या वेळी दोघांनी मिळून चोरी केल्याचे सांगितले . त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटर सायकल बाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 678/2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे . ताब्यात घेण्यात आलेला राकेश दिलवर कोकणी (वय 21)
याचे विरुद् यापूर्वी देखील मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजून आले, त्याने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील एका गावातून चोरी केल्याचे सांगितले . चोरी केलेली मोटार सायकल कोठे आहेत ? याबाबत विचारले असता त्याच्या शेतात एक मोटार सायकल ठेवलेली आहे . तसेच निलेश कोकणी यास विचारपूस केली असता त्याने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा , बालोद व सुरत जिल्हा येथून चोरी केल्याचे सांगून चोरी केलेल्या पाच मोटार सायकल त्याने त्याच्या घराच्या मागील बाजूस ठेवलेल्या आहेत माहिती दिल्याने, दोन लाख 65 हजार रुपये किमतीच्या एकुण 7 मोटार सायकली कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत . तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून गुजरात राज्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस करण्यात आलेले आहेत व आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही .
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधीक्षक, सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , राकेश वसावे , राकेश मोरे , मनोज नाईक , मोहन ढमढेरे , अभय राजपुत , आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे .
Users Today : 8