जातपडताळणीच्या त्रृटीचे प्रस्ताव 12 डिसेंबर पर्यंत जमा करण्याचे आवाहन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार 
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ज्या अर्जदारांचे प्रस्ताव त्रृटी अभावी समितीकडे प्रलंबित आहे. अशा अर्जदारांनी त्रृटीची पुर्तता करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य प्राची वाजे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांच्याकडे अनुसूचित जमाती वगळून ज्या अर्जदारांचे शैक्षणिक, सेवा, निवडणूककरिता जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहे अशा अर्जदारांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी सोमवार 12 डिसेंबर,2022 पर्यंत प्रस्ताव जमा करावे.  त्रृटी पूर्ततेअभावी प्रस्ताव प्रलंबित राहिल्यास अर्जदार जबाबदार राहील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी असे  प्राची वाजे यांनी कळविले आहे.
0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *