चिखली
विधानसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेष मध्ये कॉग्रेस पक्षाने जे घवघवीत यष मिळवले व स्पष्ट बहुमत मिळवले त्याचा चिखली शहर कॉग्रेस कमिटी तर्फे फटाके फोडुन व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.स्थानिक जयस्तंभ चौकामध्ये माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या जनसेवा कार्यालया समोर कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने जमा झाले. हिमाचल प्रदेषमध्ये मागिल पाच वर्षाची भाजपाची सत्ता उलथुन जो कॉग्रेस पक्षाने विजय मिळवीला त्याचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.भाजपाच्या साम,दाम,दंड,भेद व सत्तेचा व सरकारी मषिनरीचा दुरउपयोग झुगारून जे हिमाचल प्रदेष मधील मतदारांनी जो कॉग्रेस पक्षावर विष्वास दाखवून 68 पैकी 40 जागांवर कॉग्रेस पक्षाचे आमदार निवडुण स्पष्ट बहुमत दिले त्याबध्दल चिखली शहर कॉग्रेसच्या वतीने त्या मतदारांचे आणी हिमचल प्रदेष मधील कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले, यावेळी कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला त्यावेळी चिखली शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. मोहमंद इसरार, नगरसेवक आसिफ भाई, विजय गाडेकर, राजु रज्जाक, गोकुळ षिंगणे, यांच्यासह सुरेष बोंद्रे, अमिन खान, सचिन बोंद्रे, कैलास खराडे, शहेजाद अली खान, डॉ. अमोल लहाने, खलील बागवान, पप्पु जागृत, प्रा.राजेंद्र गवई, जाकीर भाई, भास्कर चांदोरे, आष्विन जाधव, पवन रेठे, शकील खान, भारत श्रीवास्तव, मोहमंद हिरीवाले, भगवान तांगडे, अब्रार बागवान, सादिक जमदार, हानिफ बागवान, कैलास जंगले, तेजस अवसरमोल, कुंदन हिवाळे, अक्रम बागवान, यांच्यासह असंख्य कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 38