प्रविण चव्हाण
नंदुरबार : – गेल्या ५ वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ संपायला थोडाच कालावधी बाकी आहे असे असतांना देखील नंदनगरीच्या विकास हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार शहरातील विरल विहार मध्ये नगरपरिषदेच्या वतीने बांधकाम करण्यात येणाऱ्या दत्त मंदिराचे प्रवेशद्वार,मंदिर ट्रस्टच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन व स्व. शशिकला सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ बाबूलाल मामराज अग्रवाल परिवार यांच्याकडून बांधून देण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन नगराध्यक्षा रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मेघा राम रघुवंशी,उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक रवींद्र पवार,प्रमोद शेवाळे,नगरसेविका मनीषा वळवी,उद्योजक किरण तडवी, सामाजिक कार्यकर्ते नितेश अग्रवाल,चेतन वळवी,अतुल पाटील, होळ हवेलीचे सरपंच मनीष नाईक उपसरपंच शोभा पवार,सदस्या रत्नप्रभा खैरनार,रुपेश जगताप,सुभाष अग्रवाल,जगदीश अग्रवाल,राजेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी म्हणाल्या,उपक्रमांच्या माध्यमातून सर्व नागरिक एकत्र येत असल्याने विचारांची देवाण-घेवाण होऊन एकमेकांना सुख दुःख वाटून घेता येते. समाजात राहून समाजाचे ऋण फेडण्याचे काम अग्रवाल कुटुंबीयांनी केल्याची त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुनील कुवर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्त मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
अग्रवाल कुटुंबीयांची दातृत्व
स्व.शशिकला सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ बाबूलाल मामराज अग्रवाल यांच्या परिवाराकडून दत्त मंदिरात सभामंडप उभारण्यात आले आहे. साडेतीन ते चार लाख रुपये खर्च लागल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितेश अग्रवाल यांनी सांगितले.अग्रवाल कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचे नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी कौतुक केले.
Users Today : 9