खासदार प्रतापराव जाधव याचा तीव्र निषेध  …

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा

आ.प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभर संताप व्यक्त होत असतांना बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मात्र आमदार लाड यांचे समर्थन केले. याचा तीव्र निषेध करीत शिवप्रेमींनी निदर्शने केली. पक्ष बदलण्या इतके शिवाजी महाराजांच्या जिवनातीतल प्रसंग बदलणे सोपे आहेत का? असा खडा सवाल शिवप्रेमींनी केला आहे.खासदार प्रतापराव जाधव यांनी आमदार लाड यांचे समर्थन केल्याने केळवद येथील शिवप्रेमी विचार मंचाने 7 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यापुढे आत्मक्लेश केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शिवरायांची विधिवत पुजा अर्चा केली. खा.जाधव शिवसेनेशी सोडचिठ्ठी देऊन गेले. हे समजण्यासारखे आहे. राजकीय भुमिका मान्य करता येतील पण आता ते शिवरायांनाही सोडचिठ्ठी देत आहे. प्रसाद लाड यांनी अत्यंत चुकीचा इतिहास मांडला. मात्र खासदार त्यांचे समर्थन करतात. ही शिवप्रभूंशी सत्तेच्या लालसेपोटी केलेली गद्दारी असल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष नारायण वाणी म्हणाले. तर शिवसैनिक गणेश यंगड यांनीही खासदारांच्या भुमिकेवर तोफ डागली. शिवप्रभु यांनी खासदार जाधवांना सुबुध्दी द्यावी. त्यांचा सद्सदविवेक कायम जागृत राहावा यासाठी गावातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे प्रार्थना म्हणण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने केली. सामाजिक कार्यकर्ते नंदुआप्पा बोरबळे यांनी खा.जाधव यांच्या भुमिकेचा निषेध करुन जे शिवरायांना विसरतात लोक त्यांचे नावही शिल्लक ठेवत नाही, असा टोला लगावला.यावेळी नारायण वाणी, गणेश यंगड, गणेश निकम, ज्ञानदेव कालेकर, गोपाल वाघमारे, अशोक मोहिते, दामू जाधव, विजय ठेंग, धनराज पाटील, भास्कर पांढरे, जगन्नाथ आप्पा खोडके, विरुभय्या यंगड, अशोक भोलाने आदी उपस्थित होते.
0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *