आदर्श विद्यालयात  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन  संपन्न

KHOZ MASTER
2 Min Read
आदर्श विद्यालय हे नेहमी उपक्रमशील  शाळा  असून भारतीय संस्कृतीप्रमाणे आदर्श विद्यालयात 6 डिसेंबर  2022 वार मंगळवारला महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमांमध्ये आदर्श विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. समाधानजी शेळके सर यांनी विद्यार्थ्यांना “शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा,” या बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. तसेच वक्ता म्हणून लाभलेली कु. स्नेहल योगेश पाटील हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जीवनातील शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच बाबींवर मार्गदर्शन केले .तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्यावर एक छोटीशी नाटिका वर्ग_7 वीतील विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये जोया शेख ,कल्याणी माने, सृष्टी जाधव, तुषार वाघमारे, वैभव झोरे, करवंदे, केळोदे ,तांबटकर  विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमांमध्ये  उत्कर्षा जोशी ,आर्या पहाडे या विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त  केले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री चवरे व सृष्टी जेऊघाले हिने केले, तर प्रास्ताविक उर्वी अनिल कड,तसेच आभार प्रदर्शन गायत्री मोळवणे हिने केले .तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभ्यासातुन आदरांजली म्हणुन वर्ग ५वी,६वी,७वी तील विद्यार्थ्यांसाठी  डाॅ.बाबासाहेबांच्या जीवनावर  निबंध स्पर्धा, चित्रलेखन स्पर्धा, लेख स्पर्धा, आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रतिसाद भरपुर होता.  सदर कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन राजे या विद्यार्थ्यांनी गीत गायन सादर केले. सदर कार्यक्रमांमध्ये भावसार मॅडम ,खोत मॅडम, रसाळ सर , शेटे सर, यांनी सहकार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सौ वानेरे मॅडम व फितवे मॅडम यांनी केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *