खरीप संपुन रब्बी पीकांची पेरणी संपत आली. पीक विम्याचे पंचनामे झाले पंरतुअद्याप ही खरीपातील पीक विम्याचा मोबदला मालेगांव तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला मिळाला नाही. पीक विम्याच्या मोबदल्याचे तात्काळ वाटप सुरू करण्यात यावे या साठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून मालेगांव तहसील समोर धरणे अंदोलन करण्यात आले. भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष विनोद घुगे यांनी धरणे अंदोलनाचे आयोजन केले होते. प्रशासनाच्या वतीने सायंकाळी चार वाजता तहसीलदार मालेगांव यांच्या विनंतीवरून ग्रामपंचायत निवडणुकी नंतर दिनांक 20 डिसेंबरनंतर मालेगांव तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करून घेणार आसल्याचे भूमिपुत्र च्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 20 डिसेंबरनंतर वाटप सुरू न झाल्यास भूमिपुत्र कडुन अमरण उपोषण करण्यात येणार आसल्याचे तालुका अध्यक्ष विनोद घुगे यांनी सांगीतले. अंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, तालुकाध्यक्ष विनोद घुगे, भास्करराव देशमुख, केशव ठाकरे, रिपाई अध्यक्ष रमेश सोनवने, विकास घुगे, प्रमोद तारक, सुरेश घुगे, भाई गोवर्धन चोथमल, माणिक गालट, श्रीधर लहाने, देवा इंगोले, नामदेव राठोड, वासुदेव झामरे, राजु कुटे, विजय काळे सह तालुक्यातील शेतकरी व भूमिपुत्र चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.
