सा.बा.विभागाचे दुर्लक्ष ; सोयगाव : जामठी ते रवाळा  व जामठी ते पिंपळा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट ग्रामस्थ आक्रमक 

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी सोयगाव गोकुळसिंग राजपूत
सोयगाव शहर मराठवाडा- खान्देश सीमेला लागुन असलेला सोयगाव तालुक्यातील रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतरही तालुक्यातील एकही रस्ता  दळणवळणासाठी चांगल्या स्थित नसल्याने तेथील जनतेला आपण अजूनही पारतंत्र्यात असल्याचे भासते.त्यातच अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने ठेकेदाराकडून सुरू असलेली रस्त्याची कामे दर्जाहीन होत आहेत.तालुक्यातील जामठी ते पिपळा ८०० मीटर व  जामठी ते रवळा सहा किलोमीटर स्त्याचे काम चालू सुरू आहे. रस्त्याची कुठलीही साफसफाई न करता तसेच रस्त्यावर डांबर न मारता रस्त्यावरती खडी अंथरण्यात आलेली आहे.या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.शासन  या रस्त्यासाठी शासनाच्या लाखो रुपये खर्च  करीत आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामावर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी वा अभियंता साधा फिरकत नसल्याने या रस्त्याचे काम अतिशय खालच्या दर्जाचे व निकृष्ट होत आहे. कोणत्याही प्रकारची दबाई न करता व डांबराचा वापर न करतांना तसेच दबाई न करता रस्ता तयार होत आहे.
चौकट
ग्रामस्थ आक्रमक रस्त्याचे काम निकृष्ठ व दर्जाहीन  होत असल्यामुळे जामठी येथील ग्रामस्थ चरणसिंग नाईक विजय  राठोड आत्माराम पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी कामावरती येऊन चौकशी करण्याची तसेच रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे होत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नसल्याने म्हटले आहे.
फोटो ओळ :- सोयगाव :-जामठी ते रवाळा  व जामठी ते पिंपळा रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पसरवलेली खडी दुसऱ्या छायाचित्रात संतप्त  ग्रामस्थ काम बंद करतांना
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *