जगप्रसिद्ध फर्दापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भंते बोधी धम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गावात  कँडल रॅली काढून केले अभिवादन

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
 सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर गावात  दिनांक:-६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विहाराजवळ  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व,परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फर्दापुर येथे सर्व बौद्ध अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्र परिधान करुन अभिवादनासाठी आले‌ होते.सर्वप्रथम बुद्ध विहारात  तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मेणबत्ती, अगरबत्ती फुले वाहुन वंदन करण्यात आले. त्यानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती पेटवून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  सामुदायिक त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली.एका गाडी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवून त्या पुतळ्याचे पुज्य भन्ते बोधीधम्मा,व फर्दापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व अभिवादन केले. त्यानंतर सर्उपासिक,लहान मूले,मुली यांनी मेणबत्या पेटवून कँडल रॅली ला सुरुवात करून ती  रॅली गावात जात असताना लांब लचक रांगा दिसत होती ” डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अमर रहे” “एकच साहेब बाबासाहेब”  “जब तक सूरज चांद रहेंगा बाबा तेरा नाम रहेंगा” “जय जय जय जय जय भीम जय भीम जय भिम या घोषणांनी परिसर दुमदुमला काही वयोवृद्ध महिलांनी डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांची  जुनी  गीते सुद्धा गायली.तेव्हा काही महिलांना अश्रू सुद्धा अनावर झाली.गावातून  रॅली  शांततेत पार पडून  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. भन्ते बोधी धम्मा व सहाय्यक पोलिस निरीक्षक, देविदास वाघमोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  कार्यावर‌ प्रकाश टाकून सखोल असे‌  मार्गदर्शन केले त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य, विजय तायडे, माजी ग्रा.प. सदस्य भीमराव बोराडे,ओम भगूरे, विशाल शिंदे,सागर बिरारे, विकी शिंदे, रंजित जगताप, अभय दामोदर,  मोठया संख्येने बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते. फर्दापुर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, व कर्मचारी निलेश लोखंडे, योगेश कोळी, पंकज व्यवहारे,आनंद पगारे, महिला होमगार्ड  यांनी आपले  कर्तव्य बजावत चोख बंदोबस्त पार पाडला.
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *