सिल्लोड येथील भव्य कृषि प्रदर्शनाचा  शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव व सिल्लोडचे मा. नामदार कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे दि १ ते ५ जानेवारी २०२३ रोजी मराठवाड्यातील पहिले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरत आहे. यावेळी प्रथमच राज्यातील चारही कृषी विद्यापीठ व महाबीज अकोला हे सहभाग घेणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे नवनवीन संशोधित वाण , आधुनिक कृषी यांत्रिकीकरण, ठिबक, तुषार सिंचन प्रणाली, शेतीतील नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. तसेच शेतीला जोडव्यवसाय जसे की पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादि विषयी मार्गदर्शन मिळणार आहे . विद्यापीठाने संशोधित केलेले उच्च उत्पादनक्षम फळाच्या जाती, लागवड पद्धती, विक्री व्यवस्थापन याची माहिती मिळेल.  शेतात वापरले जाणारे आधुनिक यंत्रसामग्रीही येथे पाहायला मिळणार आहे. शेतकरी बंधू तिथे खरेदी सुद्धा करू शकतात. तसेच इतर आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील भाग घेणार आहेत. त्यावेळेस शेतकऱ्यांचे चर्चासत्र भरविले जातील व शेतकरी ते शास्त्रज्ञ चर्चा घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल व त्यांना अचूक माहिती दिली जाईल. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी सोयगाव यांच्या वतीने सोयगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा दिनांक 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2023 मध्ये लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषि अधिकारी एस. जी. वाघ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *