पौष्टिक तृणधान्य विषयी सोयगाव तालुक्यातील गावागावात मार्गदर्शन

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव आगामी येणारे २०२३ वर्ष हे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जे पौष्टीक तृणधान्य आहेत ज्यांना इंग्रजी मध्ये minor millets म्हणतात यांचा विसर पडला आहे. आजची पिढी जंक फूडच्या मागे लागली आहे, ज्याचे घातक दुष्परिणाम आज आपणाला भोगावे लागत आहे. यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येणारे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शेतकरी बंधूंनी आपल्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर व राजगिरा यांचा आहारात समावेश करावा व रोगराई पासून दूर राहावे असे आवाहन आपणाला शासनामार्फत करण्यात येत आहे. ज्वारीमध्ये असलेल्या पोषक गुणधर्मामुळे कोलेस्टेरॉल, हृदयविकार सारख्या आजारापासून मुक्तता मिळते. बाजरीत असलेल्या सल्फऱयुक्त अमिनो असिड मुले ती लहान मुले व गर्भवती मातासाठी अतिशय उपयुक्त आहे. नाचणी ही मधुमेही व्यक्तीसाठी वरदान ठरते कारण त्यातील ग्लयसेमिक इंडेक्स रक्तातील साखर वाढू देत नाही. भगर हे धान्य कर्बोदके, कॅल्शियम व फॉस्परस या सारखे खनिज द्रव्याचे भंडार आहे. तसेच राजगिरा मध्ये कॅल्शियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. ग्लूटेन फ्री असल्यामुळे गव्हाची ॲलजी असणाऱ्या व्यक्तीसाठी राजगिरा हा उत्तम पर्याय आहे. अश्या या सर्वगुण संपन्न तृणधान्यच्या जनजागृतीसाठी तालुका कृषी अधिकारी सोयगाव एस जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  सोयगाव तालुक्यात कृषि सहाय्यका मार्फत ठिकठिकाणी याची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *