रूचिता अमित नाईक, महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा शहर
महिलाविषयी दृष्टीकोन बदलण्याची गरज असुन केवळ महिलांना आरक्षण आहे म्हणुन संधी मिळण्यापेक्षा त्या कर्तुत्वान व सक्षम आहेत म्हणून राजकारणात त्यांना संधी मिळाली पाहिजे स्त्री आणि पुरूष अशी तुलना होणे देखिल चुकीचे आहे एक महिला पक्षात आली तर संपुर्ण कुटूंब पक्षाशी जोडले जाते.बाळासाहेबांची शिवसेना च्या वतिने रूचिता नाईक यांची शहर संघटक पदी निवड झाल्याबद्दल उपतालुका प्रमुख अजित खांबे यांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी रूचिता नाईक बोलताना म्हणाल्या की महिला हि एक अशी शक्ती आहे की सर्व शक्तीचा सामना करण्याची ताकत तिच्यामध्ये असते. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे.
तरूणींनी राजकारणात येणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात महिला संघटना मजबूत करून महापालिका निवडणुकीत सज्ज ठेवणार असल्याचे त्या बोलल्या मुख्यमंत्री यांचे काम घरा घरात पोहचवून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम करणार आहे व येणारी महापालिका निवडणुकीत हि निश्चितपणे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) व भाजपा जिंकेल.
असा विश्वास रूचिता नाईक यांनी व्यक्त केला यावेळी उपतालुका प्रमुख अजित खांबे शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख उपस्थित होते.
Users Today : 2