नायलॉन मांजाचा 7,98,000/- रुपये किमतीचे 22 बॉक्सचासाठा गुन्हे शाखेकडून जप्त

Khozmaster
2 Min Read
अविनाश आघाव पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा औरंगाबाद यांची धडाकेबाज कारवाई
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद शहरासह इतरत्र आगामी संक्रांत सन साजरा होणार असल्याने प्लास्टिक सिन्थेटिक पासून बनविलेल्या मांजाची मागणी वाढल्याने त्यावर प्रतिबंध व्हावा तसेच प्लास्टिक सिन्थेटिक पासून बनविलेल्या मोज्यामुळे पक्षी व मानवी जिवीतास दुखापती होत असल्यामुळे अशा मोज्याच्या वापर, विक्री करण्यान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मा खंडपिठ, औरंगाबाद व मा. पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांनी दिले होते, सदर निर्देश प्राप्त होताच, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांचे पथक दिनांक 09/12/2022 रोजी जुना मोंढा भागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की. इसम नामे मुश्ताक खान मुसा खान वय 45 वर्ष धंदा व्यवस्थापक बालाजी लॉजिस्टीक्स, रा. नवाबपुरा औरंगाबाद व मनोहरलाल लोचवाणी रा. सिंधी कॉलनी, औरंगाबाद (मालक) यांचे गोडावूनमध्ये शहरामधील व्यापान्याचा नायलॉन मांजा शासनाने प्रतिबंध केलेला नॉयलॉन मांजा ट्रान्सपोर्टमार्फत येवून पडलेला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन बातमी मिळालेल्या ठिकाणी अचानक छापा मारुन झडती घेतली असता तेथे त्यांचे पथकाला शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजाचे पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये पॅक असलेले एकुण 7.98,000/- रुपये किमतीचे एकुण 22 नायलॉन मांजाचे चॉक्स मिळुन आल्याने दोन पंचा समक्ष जात करुन सविस्तर जप्ती पंचनामा करुन जप्त केला असून सदरील इसमाविरुध्द पोलीस ठाणे जिन्सी येथे पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन मुद्देमालासह आरोपी पी ठाणे जिन्सी यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते, मा सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल दुमे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आयाय, सहायक पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडुळे, पोउपनि श्री रमाकांत पटारे, पोना संजय नंद, संदीप तायडे, पोओ अमोल शिंदे, राहुल खरात, सुनिल बेलकर यांनी केली आहे.
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *