सावळदबारा ते देवगाव गुजरी  व सावळदबारा ते देव्हारी रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट ग्रामस्थ आक्रमक 

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी/सोयगाव.गोकुळसिंग राजपूत
सावळदबारा हे गाव मराठवाडा- ,विदर्भ व खान्देश सीमेला लागुन असलेला सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या गावाला २० ते २५ गावाचा भार असून चक्रधर स्वामींचे तिर्थक्षेत्र म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.सावळदबारा या रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतरही तालुक्यातील एकही रस्ता  दळणवळणासाठी चांगल्या स्थित नसल्याने तेथील जनतेला आपण अजूनही पारतंत्र्यात असल्याचे भासते.त्यातच अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने ठेकेदाराकडून सुरू असलेली रस्त्याची कामे दर्जाहीन होत आहेत.तालुक्यातील सावळदबारा ते देव्हारी किलो मीटर व  देवळगाव गुजरी ते सावळदबारा आठकिलोमीटर स्त्याचे काम चालू सुरू आहे. रस्त्याची कुठलीही साफसफाई न करता तसेच रस्त्यावर डांबर न मारता रस्त्यावरती खडी अंथरण्यात आलेली आहे.या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.शासन  या रस्त्यासाठी शासनाच्या लाखो रुपये खर्च  करीत आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामावर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी वा अभियंता फिरकत आहे.त्यांनी सांगून शुद्धा ठेकेदार हा मनमानी कारभार करत असल्याचे ग्रामस्थ यांच्या लक्षात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या रस्त्याचे काम अतिशय खालच्या दर्जाचे व निकृष्ट होत आहे. कोणत्याही प्रकारची दबाई न करता व डांबराचा वापर न करतांना तसेच दबाई न करता रस्ता तयार होत आहे.यावेळी प्रा.जीवन कोलते,प्रा.मनोज चोपडे,प्रा.मदन डोंगळे, सरपंच राहूल हेलोडे,तालिब हो.शब्बीर, गणेश खैरे पत्रकार,रज्जू तडवी, अक्षय कोते मुंकुदा गायकवाड,भागवत गायकवाड, रामचंद्र चिमणकर, ईश्वर वारंगणे, गजानन चव्हाण, पत्रकार रहीमखान पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते.या
रस्त्याचे काम निकृष्ठ व दर्जाहीन  होत असल्यामुळे सावळदबारा येथील ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी कामावरती येऊन चौकशी केली.तसेच रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे होत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नसल्याने ग्रामस्थांनी म्हटले आहे.”सावळदबारा ते डाभा  व देव्हारी ते पिंपळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पसरवलेली खडी खाली डांबर न टाकता ठेकेदाराने मनमानी कारभार करत तसेच दबाई करत ठेकेदारा जाॅब विचारला असता हे काम असेच करतात असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.या परिसरातील राजकीय पुढारी यांचे लक्ष नसून आंधळा दळतो व कुत्र पीठ खातो अशाप्रकारे या सावळदबारा ते देवळगाव गुजरी रस्त्यावर चित्रे दिसून येत आहे.याला आळा बसेल का? अशा प्रश्न सावळदबारा परिसरातील नागरिकांना पडला आहे.प्रा.जीवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते)सावळदबारा ता .सोयगावप्रभारी सरपंच मो.आरिफ हो.लुखमान सावळदबारा या सोयगाव
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *